*शंकरनगर येथे श्री विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवनिमीत भव्य रांगोळी स्पर्धा संपन्न.*
संग्रामनगर दि.१० (केदार लोहकरे याजकडून))शंकरनगर येथील श्री विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीने भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यामध्ये शालेय मुली व महिलांसाठी ठिपक्याची पोर्ट्रट व थीम (वेगळा अविष्कार) अशा वेगवेगळ्या तीन प्रकारच्या गटामध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या आहेत.या रांगोळी स्पर्धेत शालेय गटात १४७ मुलींनी व खुल्या गटात १०० मुली व महिलांनी सहभाग नोंदविला होता या रांगोळी स्पर्धेचे उदघाटन कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील यांचे हस्ते करण्यात आले.या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ महाराष्ट्र राज्य माजी उपमुख्यमंत्री व विजय गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील यांचे उपस्थितीत कार्याध्यक्ष आ.रणजीतसिंह मोहिते पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सत्यप्रभादेवी रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकास रोख रक्कम रुपये तीन हजार,सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र व्दितीय क्रमांकास रोख रक्कम रूपये दोन हजार,सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र तर तृतीय रोख रक्कम रूपये दिड हजार,सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देवून सन्मानित करण्यात आले. स्पर्धेतील निकाल पुढील प्रमाणे शालेय मुली इयत्ता ५-६ वी प्रथम क्रमांक कु श्रावणी विजय टकले,व्दितीय क्रमांक कु.स्वराली सुनिल कांबळे,तर तृतीय क्रमांक कु.अपुर्वा दगडू पवार यांनी मिळवला.शालेय गट मुली इयत्ता ७-८ वी गट प्रथम क्रमांक कु तनिशा आण्णसो जैन,व्दितीय क्रमांक कु.प्रज्ञा धन्यकुमार चव्हाण,तृतीया क्रमांक कु.भक्ती सचिन फुले यांनी मिळवला.शालेय गट मुली इयत्ता ९-१० वी गट प्रथम क्रमांक कु.नित्या भारत इंगोले,व्दितीय क्रमांक कु.श्रेयाली अभयसिंह रणनवरे,तृतीय क्रमांक कु.ॠतुजा नागनाथ खाटमोडे यांनी मिळवला.खुला गट मुली व महिला टिपक्यांची रांगोळी प्रथम क्रमांक कु.श्रुती नितीन भोंगळे,द्वितीय क्रमांक सौ.मंजुश्री संजय गिरमे,तृतीय क्रमांक सौ.दिपाली भारत काशीद यांनी मिळवला तर खुलागट मुली व महिला पोट्रेट रांगोळी प्रथम क्रमांक ऋतुजा संतोष पोतदार,द्वितीय क्रमांक कु.वैष्णवी शामकांत घोडे,तृतीय क्रमांक सौ.दिव्यांनी अजित थोरात,उत्तेजनार्थ साक्षी विवेक शेटे व शितल पांडुरंग दळवी यांनी मिळवला. खुला गट मुली व महिला थीम किंवा वेगळा अविष्कार रांगोळी (फ्री हॅन्ड) प्रथम क्रमांक नीता सुरेश एकतपुरे,द्वितीय क्रमांक कादंबरी राहुल सूर्यवंशी,तृतीय क्रमांक सौ. रुपाली शिवाजी घाडगे,उत्तेजनार्थ श्रेया रोहित देशमुख या रांगोळी स्पर्धेकरिता परीक्षेत म्हणून तानाजी काशीद, धनंजय साळवी,विशाल लिके,सुनील कांबळे,लक्ष्मण धोत्रे,प्रगती पाटील,मीनाक्षी कुडाव,गिरिजा नाईकनवरे व काजी मॅडम यांनी काम पाहिले. याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य तसेच श्री विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट शंकरनगर-अकलूजचे पदाधिकारी उपस्थित होते.सर्व सहभागी व विजेत्या स्पर्धकांचे मंडळाचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी अभिनंदन केले कार्यक्रमासाठी उपस्थितीत उपस्थितीत सर्व स्पर्धक व मान्यवरांचे आभार मंडळाचे सचिव अभयसिंह सूर्यकांतराव माने देशमुख यांनी मानले












