*संगणकीकरणाच्या युगातही शिक्षक व विद्यार्थ्यांचे संबंध अतूट ; प्रा.डाॅ.कुंभार**शिवरत्न शिक्षण संस्थेत शिक्षक दिन उत्साहात साजरा*
अकलूज : शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशिल मोहिते-पाटील व उपाध्यक्ष शितलदेवी मोहिते-पाटील यांनी डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीप्रत्यर्थ साजरा केल्या जाणाऱ्या शिक्षक दिना निमित्त संस्थेच्या सर्व शिक्षक प्राध्यापकांना शुभेच्छा संदेश पाठवला.शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मध्ये मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात आला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरविंद कुंभार यांच्या हस्ते सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी कै. शंकरराव -मोहिते पाटील व कै. रत्नप्रभादेवी मोहिते -पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. बीबीए या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शिक्षकांविषयी आदर भावना व्यक्त करण्यात आले. या वेळी प्राचार्य डॉ. अरविंद कुंभार यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या वेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की संपूर्ण जगाला साक्षर बनवत ज्ञानार्जनार्थ गुंतून राहिलेल्या शिक्षकांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. शिक्षकांचा सन्मान करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये औदार्य दिसून येते. संगणकाच्या आगमनानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांमधील नाते संबंध दुरावतील असा अंदाज एकेकाळी व्यक्त केला जात होता. मात्र संगणक येऊन कितीतरी वर्षे झाले तरी शिक्षक व विद्यार्थ्यांमधील नाते अबाधित राहिले आहे. संगणकीकरणाच्या युगातही शिक्षक व विद्यार्थ्यांचे संबंध अतूट राहिले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सुचिता नाईकनवरे यांनी व प्रस्तावना प्रा. नागेश मगर यांनी केले. कु. सावली कवडे हिने विद्यार्थ्यांतर्फे शिक्षकांच्या शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. प्रा.भरत साठे व प्रा. वशीम सय्यद यांनी आपले विचार मांडले. कु. अलीषा मोरे हिने आभार मानले. यावेळी प्रा. नितीन कंगळे, वरिष्ठ लिपिक अमोल खरात यांच्यासह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशा खंडागळे यांनी विशेष परिश्रम घेतले.








