” राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होतो ” —–राजश्री माने
येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिल्लीच्या राजपथावरील संचलनात महाराष्ट्राचे नेतृत्व केलेल्या कु. राजश्री लक्ष्मण माने यांचे, ” एनएसएस आणि अभ्यास ” या विषयावर व्याख्यान संपन्न झाले, यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक डॉ. चंद्रशेखर ताटे देशमुख हे होते .आपल्या व्याख्यानात कु. माने पुढे म्हणाल्या की, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंट आहे, कष्ट करण्याची तयारी आहे ,परंतु आत्मविश्वास व संवाद कौशल्याचा अभाव दिसून येतो. ती उणीव आपण भरून काढायला हवी. विद्यार्थ्यांनी या वयात मोठी स्वप्ने पाहून त्यांचा पाठपुरावा केला पाहिजे., तरच आपण यशस्वी व्यक्तिमत्त्व म्हणून पुढे येऊ शकू . कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.दत्तात्रय मगर यांनी केले .डॉ. सज्जन पवार व डॉ. चंद्रशेखर ताटे- देशमुख यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले डॉ. सविता सातपुते यांनी आभार मानले. सत्यजित चव्हाण याने सूत्रसंचालन केले.








