*सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये महिला हक्क व कायदेशीर जागरूकता विषयावर व्याख्यान संपन्न* संग्रामनगर दि.२५ (केदार लोहकरे याजकडून)सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च,शंकरनगर-अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत आज “महिला हक्क व कायदेशीर जागरूकता” या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.या व्याख्यानाचा उद्देश महिला कर्मचारी व विद्यार्थीनींमध्ये महिलांचे हक्क आणि महिलांविषयी असलेल्या कायदयाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता. या कार्यक्रमाची व्याख्यानाकरीता व्याख्याता म्हणून ॲड.हसिना वजीर शेख,सेशन कोर्ट , माळशिरस या लाभल्या.व्याख्याना करिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.इंद्रजीत यादव महाविद्यालयातील सर्व महिला कर्मचारी व विद्यार्थीनी उपस्थित होत्या. या व्यख्यानाची सुरूवात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले. या व्याख्यानात मार्गदर्शन करताना ॲड.हसिना शेख यांनी सर्व महिला कर्मचारी व मुलींना,महिलांचे हक्क व महिलांविषयी असणा-या कायदयांविषयी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले.त्यामध्ये त्यांनी हुंडा प्रतिबंधक कायदा,कौटुंबीक हिंसाचार,सायबर गुन्हे इत्यादीबद्दल उदाहरणांसह माहिती दिली.तसेच मुलींसाठी कोणकोणते हक्क व कायदे अस्तित्वात आहेत,त्या कायदयांचा वापर कधी करता येतो, मुलींच्या व महिलांच्या संरक्षणासाठी कोणकोणत्या समित्या अस्तित्वात आहेत.त्या समित्यांचे कामकाज कशाप्रकारे चालते अशाप्रकारची अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.प्रगती पाटील व महिला तक्रार व निवारण समितीमधील सर्व महिला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.प्रगती पाटील यांनी केले तर सुत्र संचालन कु.ऐश्वर्या सुर्वे व कु.वैष्णवी पारसे यांनी केले.महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ इंद्रजीत यादव यांनी सर्वांचे आभार मानले.







