*श्रीसंत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त जि.प. शाळा मुली नं. 1 मधील विद्यार्थिनींना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप*
अकलूज शहरात श्रीसंत सेना महाराज यांची पुण्यतिथी भक्तीमय वातावरणात उत्साहात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील, माजी सरपंच मा. श्री. शिवतेजसिंह मोहिते पाटील, मा. श्री. किशोरसिंह माने पाटील, नगरपरिषदेचे मुख्याध्याकारी मा. श्री. दयानंद गोरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीसंतसेनामहाराज यांच्या प्रतिमेवर फुले वाहण्याचा कार्यक्रम व महाआरती मा. श्री. शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जि.प.प्रा.शाळा मुली नं. 1 मधील इ. 5 वी ते 7 वी च्या 75 मुलींना वह्या व कंपासपेटी वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भजनी मंडळाचा सत्कार श्री. यशवंत साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य किशोर राऊत, अमर राऊत, आदेश राऊत, संतोष सूर्यवंशी, शत्रुघ्न राऊत , अनिल काशिद, हरीश भोसले, देवीदास काशिद, सचिन वाघमारे, सचिन सूर्यवंशी, सुरेश चौधरी, महेश काळे, केंद्रप्रमुख श्री. राजेंद्र जाधव, श्री. उमेश फलटणकर याप्रसंगी अकलूज पचक्रोशीतील सर्व समाजबांधव व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. श्रीकांत राऊत यांनी मानले.









