*शंकरराव मोहिते महाविद्यालयात पर्यावरण पूरक गणेशमूर्ती निर्मितीवर आधारित एकदिवसीय कार्यशाळा संपन्न.*
संग्रामनगर दि.२२ (केदार लोहकरे याजकडून) शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पर्यावरण पूरक गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेत राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक सत्यजीत चव्हाण यांनी पर्यावरण पूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले.या कार्यशाळेत एकूण 39 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. या कार्यशाळेच्या उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना डाॅ.बागडे म्हणाले की,सध्या पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत चालला आहे.प्लास्टर ऑफ पॅरिस व विविध रासायनिक रंगाचा वापर केलेल्या मूर्ती विसर्जित केल्यानंतर पाण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते.हे टाळण्यासाठी अशा पर्यावरण पूरक मूर्ती बनवणे ही काळाची गरज आहे. या कार्यशाळेला सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.विश्वनाथ आवड,विभागीय समन्वयक डॉ.चंकेश्वर लोंढे,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.सविता सातपुते,डॉ.सज्जन पवार व कार्यालयीन अधिक्षक युवराज मालुसरे उपस्थित होते.ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्तात्रय मगर यांनी केले तर राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक समाधान शेंडगे यांनी सूत्रसंचलन केले तर प्रकाश भोसले यांनी आभार मानले.












