रोटरी क्लब अकलूज च्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध सामाजिक उपक्रमाने साजरा
अकलूज (वार्ताहर) : रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष विधीतज्ञ रो. दीपक फडे यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण रोटरी प्लॉट संग्रामनगर-अकलुज येथे पार पडले.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना दीपक फडे म्हणाले की, प्रामुख्याने शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, जल व्यवस्थापन, जागतिक शांतता, महिला आणि मुलींचे सक्षमीकरण, आधुनिक भारताचे बलस्थान असणारे युवक युवतींसाठी व्यापक दृष्टिकोन या प्रमुख क्षेत्रात रोटरीचे कार्य अविरत चालू असून स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे वाटचाल करत असताना भारत देशाला विकसित राष्ट्रांमध्ये नेऊन बसवणे हे जे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आहे त्या दृष्टीने रोटरी प्रयत्न करत आहे याचा अभिमान वाटतो असे मत त्यांनी व्यक्त केले. अध्यक्षांनी आणि सचिव केतन बोरावके यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्तचे औचित्य साधत बागल वस्ती-उघडेवाडी अंगणवाडी शाळा येथे रोटरी सदस्य आणि ग्रामस्थांच्या हस्ते वीस रोपांचे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.जिल्हा परिषद शाळा बागल वस्ती उघडेवाडी येथील 107 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे मोफत वाटप करण्यात येवून उपस्थित विद्यार्थी आणि ग्रामस्थांना खाऊचे वाटप करण्यात आले.तसेच दुपारी शंकरराव मोहिते पाटील रक्तपेढी अकलूज येथे रोटरी क्लब अकलूज आयोजित रक्तदान शिबिरामध्ये एकूण 31 रक्तदात्यांनी रक्तदान करत या सामाजिक कार्यास हातभार लावला.प्रारंभी गुरुमाऊली साधना मंदिर संग्राम नगर-अकलूज येथे ध्यानधारणा शिबिर संपन्न होऊन, उपस्थित रोटरी सदस्य आणि शिबिरार्थी यांना रो.मकरंद जामदार यांनी अल्पोपहाराचा आस्वाद दिला.या विविध उपक्रमाच्याप्रसंगी रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष दीपक फडे, सचिव केतन बोरावके, खजिनदार सीए.शशिल गांधी, अमित सोनाज, नवनाथ नागणे, स्वप्नील शहा, डॉ.बाहुबली दोशी, डॉ.अमोल फडे, हनुमंत सुरवसे सर, सीए.नितीन कुदळे, इंजि.बबनराव शेंडगे, संदीप साळुंखे, धवल गांधी, स्वराज फडे, अजित वीर, कमलेश शहा, गौतम गांधी, सुशील व्होरा, आशिष गांधी, निलेश दोशी, योगेश व्होरा, जयदीप बोरावके, गजानन जवंजाळ, महावीर गांधी, मकरंद जामदार, गोमटेश दोशी, डॉ.मनीष गायकवाड, सचिन गुळवे, विक्रम कोतमिरे, जयदीप शेंडगे, उघडेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच चॉंद मुलाणी, उपसरपंच नितीन चौगुले, मगर सर, माने सर आदी मान्यवर उपस्थित होते.









