अकलूज (प्रतिनिधी )स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगीत गायन केले जाणार आहे.नागरिकांनी आहे त्या ठिकाणी थांबून राष्ट्रगीत गायन करण्याचे आव्हान राज्य सरकारने केले आहे.राज्य सरकारने याबाबत एक अध्यादेश काढला आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन राज्यसरकारतर्फे करण्यात आलं आहे.राज्यातील खासगी, शासकीय तसंच इतर सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था विद्यापीठांमधील शिक्षक विद्यार्थी सहभाग असणार आहे. तसंच खासगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था यांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे.केंद्राचं हर घर तिरंगा अभियानस्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने हर घर तिरंगा हे अभियान राबवण्यात आलं होतं. त्याला देशभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला होता.त्या अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र “आजादी का अमृत महोत्सव” अर्थात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.*स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त दिनांक ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट, २०२२ या कालावधीमध्ये राज्यात “स्वराज्य महोत्सव” चे आयोजन करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.* *”स्वराज्य महोत्सव” अंतर्गत आपल्या अकलूज शहरामध्ये “समूह राष्ट्रगीत गायन” हा उपक्रम राबवावयाचा आहे. तेव्हा सर्व नागरिकांनी उद्या दिनांक १७/०८/२०२२ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता* आपण जेथे आहात तेथे स्तब्ध उभे राहून आपले भारतीय राष्ट्रगीत गायन करून आपल्या राष्ट्रगीताचा मान राखायचा आहे. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.तसेच अकलूज मधील गांधी चौक, महर्षी चौक, प्रतापसिंह चौक, अण्णाभाऊ साठे चौक,सदुभाऊ चौक, आंबेडकर चौक,जयसिंह चौक तसेच इतर ठिकाणी असलेल्या एकूण दहा चौकात स्पीकर द्वारे अकलूज नगरपरिषद च्या वतीने राष्ट्रगीत वाजविले जाणार आहे. तरी नागरिकांनी राष्ट्रगीत सुरु झाल्यानंतर स्तब्ध राहून सहकार्य करावे. असे आवाहन अकलूज नगरपरिषद चे *मुख्याधिकारी*दयानंद गोरे यांनी केले आहे.









