*कोडोली (पन्हाळा) येथील यशवंत शिक्षण शास्र महाविद्यालयात स्वतंत्राचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.*
संग्रामनगर दि.१४ (केदार लोहकरे याजकडून)”हर घर तिरंगा” या देशभक्तिपर संदेशानुसार कोडोली (ता.पन्हाळा) येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे.प्राचार्य,प्राध्यापक, ग्रंथपाल आणि विद्यार्थी-शिक्षकांनी आपल्या कुटुंबासमवेत दि.13,14 आणि 15 ऑगस्ट 2022 या तिन्ही दिवशी आपल्या घरावर तिरंगा फडकवत ठेवायचा.ही स्मृती कायमस्वरूपी जपून ठेवण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव छायाचित्र अल्बम तयार करण्यात येत आहे.त्या अल्बमसाठी प्राचार्य,प्राध्यापक, ग्रंथपाल,प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी-शिक्षक यांनी घरातल्या झेंडा वंदनाचा प्रत्येकी एक रंगीत छायाचित्र महाविद्यालयात जमा करण्यास सांगितले आहे. दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी साडे सात वाजता यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालय,कोडोली येथे ध्वजवंदन करताना प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील,यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.






