*शंकरराव मोहिते महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न.*
संग्रामनगर दि.९ (केदार लोहकरे याजकडून)शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरच्या उद्घाटन डाॅ.अजित गांधी यांचे हस्ते करण्यात आले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे उपस्थित होते. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे यांनी,मानवी रक्ताला दुसरा पर्याय नाही. समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा झाल्याने त्यांचे प्राण वाचू शकतात,असे सांगितले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.सविता सातपुते,राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक डॉ.चंकेश्वर लोंढे डॉ.चंद्रशेखर ताटे देशमुख, कार्यालयीन अधिक्षक युवराज मालुसरे आदीसह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँकेच्या कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.दत्तात्रय मगर यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.सज्जन पवार यांनी मानले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्वयंसेवक नागनाथ साळवे यांनी केले.







