नातेपुते येथे जनता आर्मी-इंडिया संघटनेकडून अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
.नातेपुते (प्रतिनिधी )नातेपुते येथे १आॉगस्ट२०२२ रोजी अण्णा भाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.यावेळी जनता आर्मी-इंडिया संघटनेचे अध्यक्ष लखन जी सोरटे, जनता आर्मी-इंडिया दहिगाव युवक अध्यक्ष वैभव खिलारे, युवा नेते बबलू लांडगे, युवा नेते अमित (सोनू) लांडगे, पंचक्रोशीतील युवा सहकारी उपस्थित होते. जयंतीनिमित्त जनता आर्मी-इंडिया इंडिया च्या वतीने सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय नातेपुते येथे अण्णा भाऊ साठे यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली. तसेच प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम प्राचार्य. श्री.कोळेकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झाले.त्यानी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी केतन यादव, लखन सोरटे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अण्णा भाऊ साठे यांचे जीवन कार्य सांगितले. ते म्हणाले सर्व महापुरुषांनी समाजात परिवर्तन होण्यासाठी संघर्ष केला आहे. मित्रांनो म्हणून त्यांना कुणी वाटून घेऊ नका. एकत्र रहा.लाचार पुढाऱ्यांच्या प्रभावाखाली भरडले जाऊ नये असा संदेश याठिकाणी जनता आर्मी-इंडिया चे संस्थापक अध्यक्ष लखन सोरटे यांनी दिला.आमच्यासारख्या युवा तरुणांचे क्रांतिकारी कार्य पाहून खूप कौतुक केले.येणाऱ्या काळात तुम्ही महाराष्ट्राचे भविष्य आहात असा विश्वास व्यक्त केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. साठे सर, सूत्रसंचालन,श्री. सस्ते मॅडम यानी केले.






