अकलूज( प्रतिनिधी )अकलूज हे पारंपारिक सण उत्सव साजरे करणारे गाव आहे.आजही पारंपारिक पद्धतीने नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. व तदनंतर दुसऱ्या दिवशी पाटील वाड्यात गौराई चा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. नागपंचमी दिवशी जुना बाजार तळ येथे नागोबा मंदिरामध्ये विधिवत पूजा करण्याचा मान नाभिक समाजातील राऊत कुटुंबांना आहे.नागोबाचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक येत असतात.त्याचप्रमाणे महिला पारंपारिक खेळ खेळत असतात.
युवक पतंग उडवण्याचा आनंद पारंपरिक स्वरूपात हुतुतु खेळ खेळतात.महादेव मंदिर येथे वीरशैव लिंगायत महिला मंडळांनी पारंपारिक झिम्मा फुगडी व फेर धरून गाणी म्हटली. परंपरेने चालत आलेल्या दळवी परिवाराकडून गुळ शेंगदाणे वाटप कार्यक्रम झाला. यावेळी जयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी गौराई सण साजरा करत असताना बारा बलुतेदार गौराईची स्थापना करतात. कुंभार तेली माळी कोळी बुरुड डवरी नाभिक आदी समाजाकडून प्रत्येकाचा हातभार लावत चिखलाची गौराई तयार केली जाते.या गौराईचे पूजन धैर्यशील मोहिते पाटील व त्यांच्या पत्नी शितल देवी मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोहिते पाटील,माने पाटील कुटुंबातील किशोरसिंह माने पाटील सर्व सदस्य उपस्थित होते.व सायंकाळी वाजत गाजत गौरी विसर्जन निरा नदीकाठी केले. यावेळी माझी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थितीत होते कोविड नंतर तब्बल दोन वर्षांनी हा सण साजरा होत असल्याने मोठा उत्साह होता












