*पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन*
प्रतिनिधी:- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.अकलूज येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य व सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर अकलूजधील विविध मंडळांना भेटी देऊन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे युवक तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड तालुका संपर्कप्रमुख शिवम गायकवाड चौंडेश्वरवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच सतीश शिंदे माळेवाडीचे सरपंच अरुण खंडागळे राजू बागवान ऋतुराज थोरात उमेश वाघमारे शिवाजी खडतरे शहाजी खडतरे अशोक कोळी अर्जुन कोळी यांचे सह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते






