*शिवरत्न बीबीए महाविद्यालयात विद्यापीठ वर्धापनदिन, टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी*
अकलूज: येथील शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज महाविद्यालयात सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा अठरावा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या वेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यापीठ गीत गायले गेले. तसेच यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या वेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे व टिळक यांच्या प्रतिमेची पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद कुंभार यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला.






