*शिवरत्न शिक्षण संस्थेत कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबीर संपन्न*
अकलूज प्रतिनिधी ; शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशिल मोहिते-पाटील व उपाध्यक्ष शितलदेवी मोहिते-पाटील यांच्या सूचनेनुसार विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग NSS विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवरत्न शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी हिमोग्लोबीन,रक्तदाब,शर्करा,थायरॉइड ,BMI ,कोलेस्टेरॉल तपासणी या आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या वेळेस आरोग्य अधिकारी विकास मिस्किन,प्राचार्य सुमती मॅडम, शिवशरण हिरेमठ, विराट गोरे सर, स्वप्नील डोईफोडे, साहिल पवार,अश्रफ शेख सुवर्णा कारंजे, उपस्थित होते.






