अकलूज येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती सर्व महापुरुषांना अभिवादन करुन साजरी.
सयुंक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रनेते मातंग समाजाचे उर्जास्थान साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती १आॕगस्ट रोजी जगभरात साजरी होत असते. आण्णाभाऊचे विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी समाज बांधव विविध उपक्रम राबवून आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करत असतात. यावेळी जयंती निमित्तानं अकलूज येथिल विकासनगर मधिल मातंग समाजाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केलेले होते. १०२ वी जयती ही पारंपरिक पध्दतीने व्हावी म्हणून अकलूज विकासनगर येथील समाजबांधवांनी एक अनोखी पध्दतीने जयंती साजरी करण्याचा प्रयास केला. साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची मिरवणूक बैल गाडीतून पारंपरिक वाद्य वाजवत काढण्यात आली.या मिरवणूक मध्ये विविध क्षेत्रातील समाजबांधवानी सहभागी नोंदवला. मिरवणूक मार्ग सकाळी १० वाजता विकासनगर पासून सुरू झाला. विजय चौक, शिवापूर पेठ, डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे १०२ किलोचा पुष्पहार अर्पण करुन डाॕ .बाबासाहेबांना वंदन केले, आण्णाभाऊ साठे स्मारक येथे १०२ किलोचा पुष्पहार घालून जयंती सोहळा आनंदाने साजरा करण्यात आला. या जयंती कार्यक्रमात अकलूज येथिल विकासनगर व अकलूज परिसरातील सर्व मातंग समाज सहभागी झाले व या कार्यक्रमाची शोभा वाढवली. अकलूज मधिल सर्व महामानवांना वंदन करुन जयंती साजरी झाली.सकल मातंग समाज,अकलूज यांचे वतीने ही जयंती साजरी करण्यात आली.


















