रोटरी क्लब अकलूज द्वारा अकलूज येथील शंकरराव मोहिते पाटील रक्तपेढीस चहा आणि कॉफी मेकिंग मशीन भेट अकलूज (प्रतिनिधी ) : रोटरी क्लब अकलूजचे माजी अध्यक्ष आणि जेष्ठ रोटरी सदस्य डॉ.श्री.संतोष दोशी यांचे वतीने रोटरी क्लब अकलूज च्या वतीने अकलूज येथील शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँकेस चहा आणि कॉफी तयार करण्याचे ॲटोमॅटिक मशीन भेट देण्यात आले व त्याचे उद्घाटन ब्लड बँकेचे अध्यक्ष डॉ.संतोष खडतरे यांच्या हस्ते करण्यात आले.या मशीनच्या माध्यमातून रक्तदात्यांना रक्तदान केल्यानंतर गरम चहा आणि कॉफीची सोय त्वरित उपलब्ध होणार असल्याने ब्लड बँकेचे अध्यक्ष डॉ. खडतरे आणि बँकेचा सेवक वर्ग यांनी रोटरी क्लब अकलूज आणि डॉ. संतोष दोशी यांना धन्यवाद दिले.याप्रसंगी रोटरी क्लब चे अध्यक्ष ॲड. दीपक फडे, सचिव केतन बोरावके, रो.स्वप्निल शहा, रो.आशिश गांधी आणि मशीनचे देणगीदार रो.डॉ.संतोष दोशी आणि बँकेचे सेवक वर्ग आदी उपस्थित होते.








