अकलूज येथे संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा
अकलूज (प्रतिनिधी). अकलूज परिसरात श्री संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळची महापूजा गजानन जवंजाळ यांच्या हस्ते झाली. त्यानंतर श्री नामदेव महाराज यांची पालखीची अकलूज नगरीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकचा समारोप श्री विठ्ठल मंदिरात झाला. मंदिरात विठ्ठल महाराज कंदोरे यांचे कीर्तन झाले. भारतीय जनता पक्षाचे महामंत्री धैर्यशील मोहिते पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. शितलदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते दुपारची महाआरती होऊन फुले अर्पण करण्यात आली. यावेळी बोलताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, समाज बांधवांनी श्री नामदेव महाराज मंदिरासाठी जागा शोधावी, ते मंदिर पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.यावेळी माजी सरपंच किशोर सिंह माने पाटील उपस्थित होते. समाजाच्या वतीने रक्तदान शिबिर, महिला आरोग्य तपासणी, महिलांसाठी पाककला, मेहंदी, रांगोळी, चित्रकला आदी स्पर्धाही संपन्न झाल्या. कार्यक्रमास दादा मुळे, वैभव जामदार, सचिन जवंजाळ, श्रेयस चांडोले,सौ. हेमलता चांडोले,सौ. अनुप्रिया चव्हाण, वैशाली पोरे, रूपाली जामदार, लीना मुळे, विजय देवळे आदी उपस्थित होते. सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रसंगी अकलूज नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते.






