*अकलूज नगरपरिषद वतीने सर्व नागरिकांना हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्याचे आवाहन*
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक / क्रांतिकारक स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दिनांक १३ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे “घरोघरी तिरंगा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअनुषंगाने अकलूज नगरपरिषद मुख्याधिकार दयानंद गोरे यांनी अकलूज नगरपरिषद कार्यक्षेत्रातील सर्व शाळा मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर प्रतिनिधी, सर्व महिला बचतगट यांची मार्गदर्शन बैठक आयोजित केलेली होती. सदर बैठकीमध्ये मुख्याधिकारी यांनी शासनाच्या वतीने हर घर तिरंगा अभियान अंतर्गत करण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक नियम व सूचना यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.• तिरंगा झेंडा हा नागरिकांनी स्व-खर्चाने खरेदी करावा. तसेच इतरांनाही खरेदी करण्यास प्रोत्साहित करावे.•तिरंगा झेंडा खादी अथवा कॉटन, पोलीस्टर, सिल्ककापड यापासून बनविलेला असावा.•तिरंगा झेंडा हा कागदी अथवा प्लास्टिक चा आपल्या घर, आस्थापना वरती कोणीही फडकवू नये.•तिरंगा झेंडा फडकविताना सर्वात वर केशरी, मध्यभागी पांढरा व खाली हिरवा रंग असा असावा. मध्यभागातील पांढऱ्या पट्टीवर 24 रेषांचे गोलाकार निळ्या रंगाचे अशोकचक्र असावे.•प्रत्येक नागरिकाने तिरंगा झेंडा संहिताचे पालन करावे.•तिरंगा झेंडा उतरविताना काळजीपूर्वक सन्मानाने उतरवावा.•दि. 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत हर घर झेंडा उपक्रमांतर्गत लावण्यात आलेले झेंडे अभियान कालावधी नंतर प्रत्येकांनी सन्मानाने सुरक्षित ठेवावे.• अभियान कालावधी नंतर झेंडा फेकला जावू नये, तो सन्मानाने जतन करून ठेवावा.• अर्धा झुकलेला, फाटलेला, कापलेला झेंडा कुठलेही परिस्थितीत लावला जावू नये.अकलूज नगरपरिषद हद्दीतील सर्व नागरिकांनी उस्फूर्तपणे हर घर तिरंगा अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन अकलूज नगरपरिषद वतीने करण्यात आले आहे.











