*हातात कुदळ फावडे व सामाजिक जाणिवेच्या भावनेतुन..3400 बीज लागवडीचा उपक्रम.*
संग्रामनगर दि.२२ (केदार लोहकरे याजकडून)महाराष्ट्र शासन सोलापूर वन विभाग,सोलापूर माळशिरस वनपरिक्षेत्र माळशिरस व शंकरराव मोहिते महाविद्यालय,अकलूज- राष्ट्रीय सेवा योजना,सांस्कृतीक विभाग व पर्यावरणशास़्त्र यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित बीज मटका मोहिमे अंतर्गत बीज लागवड मोहिम आयोजित केली.त्यामध्ये महाविदयालयाच्या ४८ विदयार्थ़्यांनी ३४०० बीज लागवड जळभावीच्या डोंगरावर केली. अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील,अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांचे नेतृत्वाखाली महाविदयालयामध्ये विविध प्रकारचे उपक्रम आयोजित केले जातात.त्याच धर्तीवर माळशिरस वनपरिक्षेत अधिकारी डी.एम.कोकरे व प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे यांचे सहकार्याने सदर बीज लागवड मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. जळभावीच्या डोंगरात सकाळी नऊ वाजल्यापासून ते दुपारी तीन वाजेपर्यत विद्यार्थी व विदयार्थीनी यांनी श्रमदानातून बीज लागवड केली.सहभागी विदयार्थी यांचे ग्रुप करून प्रत्येकाला नियोजन समजून देणेत आले.संपुर्ण डोंगरावर खणलेल्या सिसिटीच्या मध्ये खड्डे घेवून बीज लागवड करणेत आली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.विश्वनाथ आवड प्रा.बाळासाहेब सांळुखे,डॉ.चंकेश्वर लोंढे,प्रा.सज्जन पवार,प्रा.दत्तात्रय मगर यांचेसह वनपाल एस.एम.लडकत,एच.व्ही.साळुंखे,वनरक्षक के.डब्ल्यू.शेख,धनंजय देवकर.दादासाहेब चंदनशिवे,श्रीमती शैला भोजने,कल्पना पांढरे,दादासाहेब सूळ,समाधान चोरमले,मामा हुलगे,चंद्रकांत कोळेकर,शंकर करे यांचेसह महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिंनी यांनी प्रयत्न केले.











