अकलूज येथील दादा कोंडके फॅन क्लब च्या वतीने गुरुपौर्णिमा व निळू फुले पुण्यतिथी संपन्न
अकलूज (प्रतिनिधी )13 जुलै 2022 रोजी गुरुपौर्णिमा व मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांची पुण्यतिथी ‘ची औचित्य साधून अकलूज येथील RVIP टूर्स अँड ट्रॅव्हल्स च्या ऑफिस मध्ये ‘ दादा कोंडके फॅन क्लब ‘ च्या वतीने साजरी करण्यात आली.सदर प्रसंगी प्रतिमा पूजन अकलूज मधील ज्येष्ठ साहित्यिक डॉ.पांडुरंग नलवडे व रोटरी क्लब ,अकलूज चे सचिव केतन बोरावके यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांतीलाल एकतपुरे यांनी करून निळू भाऊंच व्यक्तिमत्व नेमकं कसं होत यावर प्रकाश टाकला . डॉ पांडुरंग नलवडे यांनी गुरुपौर्णिमेच महत्व विषद केले .या प्रसंगी दादा कोंडके फॅन क्लब चे सदस्य विक्रम वैद्य व सचिन एकतपूरे उपस्थित होते .रोटरीयन गजानन जवंजाळ यांनी आभार मानले तरसूत्रसंचालन प्रथमेश उरवणे यांनी केले. वैभव आंबेकर यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.






