आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घेतले सोपानकाका पालखीचे दर्शन
अकलूज (प्रतिनिधी )संत सोपानकाका यांची पालखी पंढरपूर कडे मार्गस्थ झाली असून या सोहळ्याचे आगमन 5जुलै रोजी अकलूज येथे झाले. अकलूज येथील विठ्ठल मंदिर येथे या पालखीचा मुक्काम होता. पालखीचे आगमन झाल्यानंतर अकलूज नगरपरिषद ने पालखीचे स्वागत केले. त्यानंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी या पालखीचे दर्शन घेतले.याप्रसंगी राजू शेटे, शितल मगदूम, अतुल शेटे, भैय्या ताटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.








