साडेपाच हजार भाकरी, झुणका, ठेचा एकदम ओकेच….. डोळे निवतील कान। मना तेथे समाधान॥संता महंता होतील भेटी। आनंदे नाचो वाळवंटी॥ते तीर्थांचे माहेर। सर्व सुखांचे भांडार॥जन्म नाही रे आणिक। तुका म्हणे माझी भाक॥तुकोबारायांच्या अभंगातील या ओळींप्रमाणे पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ज्ञानोबा माऊली तुकाराम….तुकाराम’ सह विठ्ठल नामाच्या जयघोषात व टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपुराकडे वाटचाल करणारा लाखो वैष्णवांचा मेळा मांडवे फाट्यावरून आपल्या माळशिरस मुक्कामी निघाला. करोना संसर्गामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर यंदाचा पालखी आणि वारी सोहळा खास असणार हे नक्कीच. गेली पंधरावर्षे झाली सदाशिवनगर येथील कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व ज्यु कॉलेजचा कै. रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते पाटील अन्नदान सेवा प्रकल्प मांडवे ओडा विसावा येथे चालू आहे. सालाबादप्रमाणे या वर्षी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक श्री देठे सर व शिक्षक यांच्या आव्हानाला उत्स्फूर्तपणे प्रतिसात देत साडेपाच हजार भाकरी, चपाती सकाळी आठच्या अगोदर गोळा झाल्या. विद्यार्थ्यांनी फक्त भाकरीच नाही हिरव्या मिरच्याचा ठेचा, लोणचे, चटणी, धपाटे व कांदेही आणले. मांडवे फाट्यावर गरम गरम ४० किलोचा झुणका, भाकर, लोणचं वारकरी घेऊन तिथेच बसुन किंवा चालत चालत हरिनामाचा गजर करत असआ अस्सल ग्रामीण भोजनाचा आस्वाद घेत होते. गरम जुंका भाकर घेण्यासाठी लांबच्या लांब रांग लागली होती. इकडे सालाबादप्रमाणे श्री शंकर सहकारी साखर कारखान्यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी जेवणाची सोय केली होती. त्यामध्ये ज्युनिअर कॉलेज च्या सर्व विद्यार्थ्यांनी पंगती संपेपर्यंत वारकऱ्यांना भोजनाचा आस्वाद दिला. गेली पंधरा वर्षे झाली संस्थेचे मार्गदर्शन संचालक मा. श्री. जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष मा. श्री. संग्रामसिंह मोहिते पाटील, स्था. प्र. समिती सभापती व सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली हा अन्नदान सेवा प्रकल्प सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवकांच्या सहकार्याने चालू आहे.







