*राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांच्या पाठीशीः अजित पवार*
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी राहणार आहे. आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडणार नाही. बंडखोरी करणाऱ्या आमदारांना त्याची किमत मोजावी लागणार आहे, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली आहे. बंडामागे भाजपाचा हात दिसत नसल्याचे पवार यांनी सांगितले. राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार म्हणाले, सत्तासंघर्षात असे अनेक प्रसंग घडत असतात. बंडखोरी करणाऱ्या आमदारांना त्याची किमत मोजावी लागणार आहे. हे सरकार टिकविण्यासाठी उद्धव ठाकरे यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. बंडखोरी करणारे काही आमदार परत आले आहेत. आमदार नितीन देशमुख, किशोर पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केले आहे. नाना पटोलेंच्या वक्तव्यावर नाराजी आमच्या पक्षाची भूमिका आघाडी सरकार टिकविण्याची आहे. आमच्या मित्र पक्षातील काही जण वेगळे सांगत आहे. ते चुकीचे असल्याची सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. निधी वाटपात कधीही दुजाभाव केलेला नाही. सगळ्यांना विकासकामांसाठी निधी दिलेला आहे. तिन्ही पक्षाचे पालकमंत्री वाटप समानतत्वावर झाले आहे. शेवटी सरकार टिकविण्याचे जबाबदारी तिन्ही पक्षाची आहे. संजय राऊतांचा विधानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा करणार आहे. राऊत बोलले तसं काही ठाकरेंच्या मनात आहे. का ते विचारू असे ही पवार यांनी सांगितले







