*या आयएएस आयपीएस लोकांचं करायचं काय ???*
एका महत्त्वाच्या बातमीकडे सर्वांचे दुर्लक्ष झालेले आहे .बातमी अशी आहे की , दिल्ली सरकार मधील आयएएस अधिकारी संजीव खिरवार यांच्या कुत्र्यास मोकळेपणाने मैदानात फिरता यावे म्हणून दिल्ली येथील त्यागराज स्टेडियममधील क्रीडापटूंचे प्रशिक्षण लवकर बंद केले जायचे . कुत्रा आणि खिरवार पती पत्नीला मुक्तपणे फिरता यावे यासाठी संध्याकाळी सात वाजता त्यागराज स्टेडियममधील प्रशिक्षण संपूर्णपणे बंद केले जात असे . याबाबतचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसमध्ये गुरुवार दिनांक २६ मे २०२२ रोजी पहिल्या पानावर प्रकाशित झाले . संजीव खिरवार सोबत त्यांची आयएएस पत्नी रिंकू डग्गा यासुद्धा फिरायच्या . जसे काही स्टेडियम त्यांच्या बापजादाच्या मालकीचे होते . बातमी प्रसिद्ध झाल्यावर सरकारने या दोन्ही आयएएस अधिकार्यांची बदली केली. खिरवारला लडाख येथे आणि रिंकू बाईला अरुणाचल प्रदेशात पाठविले
.*अधिकाराचा माज …*
प्रश्न या दोघांची बदली झाली इतकाच मर्यादित नाही . तर मूळ प्रश्न असा आहे की यांना या अधिकारपदाचा इतका माज येतोच कसा ? बऱ्याच पुरुष अधिकाऱ्यांपेक्षा महिला अधिकाऱ्यांमध्ये काकणभर घमेंड जरा जास्तच असते .*माकडाच्या हातात …*आयएएस आणि आयपीएस मंडळी ही स्वतः संस्थानिक असल्यासारखीच वागत असतात . स्वतःला लोकशाही व्यवस्थेमधील राजे , राजपुत्र , संस्थानिक समजतात . अमर्याद अधिकार मिळाल्याने हे वाटेल तसे वागतात . माकडाच्या हातात कोलीत दिल्यावर जसे वागते अगदी तसेच वागतात
.*सचिवालय नव्हे मंत्रालयच …*
आत्ताचे मंत्रालय हे पूर्वीचे सचिवालय म्हणून ओळखले जायचे . सचिव म्हणजे सेक्रेटरी म्हणजे आयएएस . सचिवाचे आलय म्हणजे सचिवांचे घर . सचिवालय . या लोकांचा फालतूपणा हुशार राजकारण्यांच्या लक्षात आला . त्यांनी सचिवालय नाव बदलून मंत्रालय केले . हे सांस्कृतिक दृष्ट्या आणि नैतिकदृष्ट्या योग्यच आहे . मंत्र्यांचे उत्तरदायित्व हे जनतेशी असते . सचिवाचे उत्तरदायित्व हे जरी कागदोपत्री जनतेशी असले तरी व्यावहारिक दृष्ट्या त्याचे उत्तरदायित्व कोणाशीच नसते . त्याचे उत्तरदायित्व त्याच्या खात्यातील वरिष्ठांशी असते . म्हणजे एका आयएएसचे उत्तरदायित्व दुसऱ्या आयएएस च्या हातात असते . म्हणजे सगळाच भ्रष्ट कारभार .राजकारणी जर चुकीचे वागले तर ते पाच वर्षांनी निवडून येत नाहीत . त्यांना त्यांच्या कर्माची फळे मिळतात . काही काही राजकारण्यांची तर आयुष्य उद्ध्वस्त होतात . परंतु या आयएएस आणि आयपीएस मंडळींचे काहीही वाकडे होत नाही . फार फार तर बदली . जास्त मलईदार पोस्टवरून कमी मलईदार पोस्टवर बदली होते .
*भ्रष्ट राजकारणी ? काहीतरीच ..*
आम्ही भ्रष्ट म्हणून राजकारण्यांकडे बोट दाखवतो परंतु भारतामध्ये सर्वात जास्त भ्रष्ट कोण असतील तर ते हे आयएएस आणि आयपीएस . हे अधिकारी शंभर पिढ्यांचे भले होईल इतकी कमई करून ठेवतात आणि वर नैतिकतेच्या गोष्टी सांगायला , भाषणबाजी करायला सर्वात पुढे असतात
.*पूजा सिंघल ….*
दिनांक ६ मे २०२२ रोजी झारखंड या गरीब राज्यातील आयएएस अधिकारी पूजा सिंघलच्या घरी ईडीने कारवाई केली . त्यावेळी कोट्यावधी रुपयांची रोकड मिळाली . ती रोकड मोजण्यासाठी नोटा मोजण्याचे कित्येक यंत्रे वापरावी लागली . तिचा चार्टर अकाउंटंट सुमनसिंग याच्याकडे जवळजवळ वीस कोटीची रोख रक्कम मिळाली . हा घोटाळा किमान ३०० कोटी रुपयांचा असावा असे प्रथमदर्शनी तपासात दिसते .
*भ्रष्ट रेकॉर्ड …*
ही पूजा सिंघल सन 1999 च्या बॅचची आयएएस अधिकारी आहे . ती वयाच्या एकविसाव्या वर्षी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली . त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेतली गेली . तिच्या बावीस वर्षाच्या सर्विस मध्ये इतकी कमाई आणि इतकं अधःपतन . काय तर म्हणे स्त्री शक्ती .गोंडा घोळणार्या अधिकारी …सन २०१३-१४ मधील घटना . मुंबई पालिकेतील एक तत्कालीन आयएएस अधिकारी बाईच्या निष्काळजीपणामुळे माझगाव येथील बाबू गेनू मंडई इमारतीतील ६२ रहिवाशांना आपला जीव गमवावा लागला . यामध्ये दै . ‘ सकाळ ‘ मधील योगेश पवार या तरुण आणि धडाडीच्या पत्रकाराचाही समावेश होता . हे सर्व पालिकेचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय होते . या आयएएस महिला अधिकाऱ्याने वेळीच इमारत आणि पुनर्विकास / दुरुस्तीचा निर्णय घेतला असता तर हे जीव वाचू शकले असते . या आयएएस बाई त्या फाईलवर अनेक महिने नुसत्या बसून होत्या . दुर्घटना झाल्यानंतर त्यांच्या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांनी या बाईना वाचवले . नाही तर या बाई एव्हाना जेलमध्ये खडी फोडायला गेल्या असत्या . मंत्र्यांसमोर गोंडा घोळणे आणि पत्रकारांशी उत्तम संबंध ठेऊन आपण किती कर्तृत्ववान अधिकारी आहोत हे मिरवण्यात बाई माहीर आहेत .
*परमविरसिंग….*
ही आयपीएस मंडळी पण काही कमी नाही बर का . मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत . त्यात खंडणी सारखे गुन्हे आहेत . हे महाशय शिस्तप्रिय असल्याचा आव आणायचे . शिस्तीच्या नावाखाली घातला गेलेला सावळागोंधळ आता समोर येत आहे .
*खासदार सत्यपालसिंग …
*मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपालसिंग सकाळीच तडकाफडकी राजीनामा देऊन दुपारी उत्तरप्रदेशमध्ये जाऊन लोकसभेचा भाजप पक्षाचा उमेदवारी अर्ज भरतात . या माणसाने गोरगरिबांना काय न्याय दिला असेल ? सगळी नोकरी त्यांनी राजकीय पक्षाच्या दृष्टिकोनातूनच केली नसेल कशावरून ?
*रश्मी शुक्ला बाई …*
महिला आयपीएस रश्मी शुक्ला बाई एका राजकीय पक्षासाठी युनिफॉर्म च्या बुरख्याखाली खबरेगिरीचे कर्तव्य बजावतात . त्या महिलेकडून न्यायाची काय अपेक्षा ठेवणार ? म्हणे स्त्री शक्ती
.*खंडणीखोर त्रिपाठी …*
दहा-बारा वर्षांपूर्वी आयपीएस म्हणून नोकरीस लागलेला मुंबईतील उपायुक्त दर्जाचा त्रिपाठी नावाच्या महाभागावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने तो सध्या फरार घोषित आहे . लाज वाटली पाहिजे आयपीएस म्हणून घेणाऱ्या अधिकाऱ्यांना . आयपीएस लोकांची एक युनियन आहे . ही युनियन कधीही असल्या भ्रष्ट घटनेवर आपले मत प्रदर्शित करीत नाही . काही अडचण आहे का युनियनला ? भ्रष्ट अधिकाऱ्यांना रस्त्यात नागडे करून मारणे हाच एकमेव पर्याय असू शकतो का ? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे .
*समीर मियाँ …*
एक तो समीर मियाँ वानखेडे . सेलिब्रिटी वर खोटे गुन्हे दाखल करून स्वतः सेलेब्रिटी होण्याचा प्रयत्न करीत होता . त्याबरोबरच मलई पण खात होता . सध्या नोकरी कशी वाचेल या विवंचनेत ‘ भाई ‘ हात चोळत बसले आहेत .*यूपीएससी परीक्षा बंद करा ..
* आमचे स्पष्ट मत आहे की यूपीएससी परीक्षाच बंद करावी . नको ते आयएएस आयपीएस . जर त्यांना ठेवायचेच असेल तर त्यांचे अमर्याद अधिकार तरी कमी केले पाहिजेत . राज्याराज्यांमधील विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांच्यातून अधिकारी निवडावेत ( एमपीएससी ). आता हे अधिकारी सुद्धा भ्रष्टच बर का परंतु दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने पाहावे लागेल .
*इंग्लंडमधील व्यवस्था…
*ज्यांनी आमच्यावर दीडशे वर्षे राज्य केले त्या इंग्लंडमध्ये आयपीएस या दर्जाचे रँकच नाही . इंग्लंडमध्ये पोलीस शिपाई ते पोलीस कमिशनर अशी त्यांची पदे असतात . पोलीस शिपाई जितका जास्त सक्षम तितक्या लवकर तो कमिशनर पदापर्यंत आपल्या हुशारीने जाऊ शकतो .*मानसिक रुग्ण …*
यूपीएससी परीक्षेच्या नादाला लागून लाखो तरुण मुला-मुलींच्या आयुष्य दरवर्षी उध्वस्त होत आहे . यूपीएससी देणारी मुले अपयशामुळे मानसिक रुग्ण होत आहेत .*गरिबांची लेकरं…*एखाद्या गरीब घरातील मुलगा आयएएस आयपीएस झाल्यावर त्याच्यात ३६० डिग्री चा बदल होतो . त्याला गरिबाबद्दल काही वाटत नाही . ते स्वतःची गरिबी लगेच विसरतात . श्रीमंतांचे भले व्हावे म्हणून गरिबांवर कसा अन्याय करता येईल या मानसिकतेतून ते विचार करतात . त्यांची गरिबी ही विद्यार्थ्यांपुढे कराव्या लागणाऱ्या भाषणातील फक्त स्टोरी उरते . बाकी काही नाही . प्रचंड भ्रष्ट होऊन जातात ही गरीबाघरची लेकरं .
*पाच टक्के प्रामाणिक …
* सगळेच आयएएस आयपीएस भ्रष्ट आहेत असे बिलकुल नाही . जे काही पाच टक्के आहेत त्यांच्या जिवावरच या देशाचा प्रशासकीय गाडा चालू आहे . त्या पाच टक्क्यांना कडक सलामच केला पाहिजे . परंतु या पाच टक्क्यांसाठी मात्र या ९५ % भ्रष्ट अधिकार्यांना आपण कसे काय माफ करू शकतो ?*जन आंदोलन*या भ्रष्ट आयएएस आणि आयपीएस यांच्या विरोधात संपूर्ण देशात जन आंदोलन उभी राहिली पाहिजेत . ही चळवळ राष्ट्रहिताची असेल यामध्ये कोणतीही शंका नाही .
*झटक्यात प्रचंड वाढणारी मालमत्ता …
*आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या मालमत्ता झटक्यात प्रचंड पटीने वाढतात कशा याची सखोल चौकशी करण्याची गरज कुणालाच कशी वाटत नाही ?जय भारत ऍड .विश्वास काश्यप ,माजी पोलिस अधिकारी ,मुंबई .







