*अहिल्यादेवींच्या 297 व्या जयंतीच्या निमित्ताने समाजाच्या गावागावात होळकरशाहीचा जागर होवू द्या नि जगाला धनगरांचा इतिहास कळू द्या.!
युवा नेते शिवाजी मोरे-पाटील
*बंधूनो,दि-31/5/2022 रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती आहे.ही जयंती आपण नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी केली पाहीजे असे मला तरी वाटते.कारण आज डिजे लावून रात्रभर नाचून जयंती साजरी करण्याचे फॅड सुरू झाले आहे मित्रांनो, आज आपलं नाचून भलं होणार नाही तर वाचून भलं होणार आहे हे विसरता कामा नये.नाचणारी मंडळी अजून अंगात टाकल्याशिवाय नाचत नाही हा त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याकरीता आयुष्यभर सात्वीक विचाराने जगणार्या अहिल्यादेवींचा आदर करायचा असेल तर त्यांची जयंती सात्वीक पध्दतीने साजरी केली तरच राजमातेच्या मृतात्म्यास देखिल समाधान वाटेल त्यासाठी गावोगावी होळकरशाहीचा जागर वक्त्याच्या भाषणाने,गावांमध्ये शाळांमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,गायन स्पर्धा,पोवाडे,नाटक,वेशभूषा,एकपात्री प्रयोग स्पर्धा घेवून,धनगरी ओव्या, ढोल वाद्यांच्या गजरात, पारंपारीक वेशभूषा करून जर धनगरांचा इतिहास गावोगावी मांडला गेला तर घराघरात धनगरांचे महान कार्यकर्तृत्व व गौरवशाली इतिहास पोहचेल तसेच धनगरांचा इतिहास येणाऱ्या पिढ्यांना कळेल.काही विद्वान म्हणतात “जो समाज इतिहास विसरतो त्या समाजाचा भविष्यकाळ अंधकारमय असतो.” आपला भविष्य काळ अंधकारमय होवू नये म्हणून समाजाचा खरा इतिहास समाजापुढे मांडणारे वक्ते समाजात निर्माण व्हावेत व अशा वक्त्यांनी समाजाची बाजू निरपेक्षरीत्या मांडली पाहीजे.दुसऱ्या जातींना शिव्याशाप देवून जातीजातींमध्ये तेढ निर्माण करणारे निव्वळ विकावू,बाजारु वक्ते नसावेत.त्यासाठी कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता समाजासाठीच जगणारा नि समाजासाठीच झटणारा खरा समाजसेवी वक्ता पाहीजे.अशा योग्य वक्त्यांची निवड करुनच वक्त्याला निमंत्रीत करावे तरच तो वक्ता समाजाला योग्य दिशा देवू शकेल.त्यासाठी प्रत्येक गावात,वाड्या व वस्त्यावर छोट्या मोठ्या प्रमाणात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्याचा प्रयत्न गावातील तरुणांनी करावा व गावातील प्रमुखांनी पक्षभेद,गट-तट न पाळता त्यांना साथ द्यावी व गावागावात तरूणांच्या समाजासाठी लढणाऱ्या फौजा तयार कराव्यात ही विनंती.* *तसेच या जयंतीच्या अगोदर या पंधरा दिवसात समाजाच्या छोट्या छोट्या गावात (शहरात नाही) गावदरवाजे,कमानी,सभागृह,सभामंडप,चौक असतात त्यांचे नामकरण करा.त्यांना पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींचे,सुभेदार मल्हारराव होळकरांचे,राजे यशवंतराव होळकरांचे नावे द्या . गावात जर इतर समाजाचे लोक राहत असतील तर एकदोन ठिकाणी त्यांच्याही महापुरूषांची नावे द्या त्यांचाही सन्मान करा व धनगरांचा मोठेपणा आस्तित्व सर्वांना दिसू द्या.या जयंती उत्सवाच्या अगोदर पेंटर कडून गावोगावी असणाऱ्या सभामंडप,समाज मंदिर,गावदरवाजा,चौक,व्यायामशाळा,अभ्यासिकां यांच्यावर ग्रामपंचायतीच्या वतीने खर्च करून आपल्या महापुरूषांची नावे टाकून घ्या. त्यामुळे वातावरण निर्मीती होईल व आपल्या महापुरूषांची नावे तरी पुढच्या पिढींना माहीत होतील व पुढील पिढ्या त्या महापुरूषांच्या इतिहासाचा अभ्यास करून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वाभिमानी पिढ्या उदयास येतील. चौकाचौकात आपले स्वतः चे बॅनर बनवून पैशांचा अपव्यय करण्यापेक्षा कमी पैशात वस्तू आणि वास्तूंचे सुशोभीकरणही होईल व ऐतिहासीक महापुरूषांची नावे ही सतत सर्वांच्या डोळ्यासमोर राहतील व त्यांचा सतत सन्मान होत राहील व जगालाही समजेल की,आतापर्यन्त आपण कोणत्याच क्षेत्रात विचारात न घेतलेला धनगर समाज आज जागा झालाय आता त्यांचा विचार करावाच लागेल.*
*आपलाच:- *चि.शिवाजी मोरे-पाटील,युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माळशिरस.*











