*केंद्र सरकारच्या विरोधात महागाई च्या निषेधार्थ योध्दा प्रतिष्ठान सह दलित महासंघाचे” अंगाला चिखल माको ” आंदोलन*
अकलूज (प्रतिनिधी ) जीवनावश्यक वस्तूंचे खाद्य तेल, पेट्रोल डीझेल, गँस, यांचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. कोरोना काळाच्या भयंकर महामारीतुन सर्वसामान्य लोक नुकतेच बाहेर पडले आहेत.तोच केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला आधार द्यायचा सोडून उलटपक्षी महागाईच ओझ सर्वसामान्य जनतेवर लादण्याचं काम केंद्र सरकार करत आहे,आम्ही केंद्र सरकारला निवडून देऊन स्वतः चिखलात दगड मारुन अंगावर चिखल उडवून घेतला आहे. असं आम्हाला वाटतंय म्हणून स्वतःच्या अंगाला चिखल लावून ” चिखल माखो ” या आंदोलनाचा पवित्रा आम्ही घेतला आहे.व आंदोलन करुन केंद्र सरकारने सर्व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ कमी करावी. अशा आशयाचे निवेदन योध्दा प्रतिष्ठान व दलित महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रांत कार्यालय समोर अकलूज येथे चिकल माको आंदोलन करून निवेदन देण्यात आले. सदर निवेदन प्रांतकार्यालयाच्या नायब तहसीलदार श्रीमती यु आर देसाई मॅडम यांनी प्रांताधिकारी यांच्या वतीने स्वीकारले. महागाई कमी न झाल्यास याही पेक्षा तीव्र आंदोलने छेडण्यात येतील असा इशारा योध्दा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष शेखरभैय्या खिलारे यांनी दिला. सदरप्रसंगी दलित महासंघ प.महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ खिलारे, विभागीय अध्यक्ष बच्चन साठे, जिल्हा उपाध्यक्ष युवा आघाडी पप्पू मिसाळ,संपत खिलारे ,तालुका विभागप्रमुख सचिनभाऊ रणदिवे, (पत्रकार),शेतकरी पुत्र शिवराम गायकवाड, शिवदत्त नामदास,रोहन गायकवाड (अध्यक्ष),बिपीन बोरावके, राजू जाधव,अभिषेक भारती,कुमार साठे,सोनूभैय्या साठे ,सुरज साठे, सदर आंदोलनास तानाजी साठे अ संघटीत कामगार युनियन यांनी पाठींबा दिला व योद्धा प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्त्यांसह महिलांचा मोठा सहभाग होता.











