अकलूज येथे बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने सामाजिक ऐक्य परिषद व कृतज्ञता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन
अकलूज, : बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता अकलूज येथील आई श्री रिसॉर्ट, नवीन एस.टी. स्टँडजवळ येथे सामाजिक ऐक्य परिषद व कृतज्ञता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा, समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार करण्यासोबतच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. धैर्यशील मोहिते-पाटील असून, बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. सुनील ओहोळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
या सोहळ्यास सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. बाबासाहेब देशमुख, माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. अभिजित पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मा. राहुलजी वाघमोडे, महाराष्ट्रातील नामांकित हृदयरोगतज्ज्ञ मा. डॉ. एम. के. इनामदार, अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व आरपीआयचे राज्य संघटक मा. नंदकुमार कांगार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे राज्य उपाध्यक्ष मा. प्रशांत बाबर, संत सावता माळी महाराजांचे वंशज मा. रमेश महाराज वसेकर, बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय सचिव मा. डॉ. अमीर मुलाणी आणि राजमाता अहिल्याबाई होळकर संस्थान, इंदूरचे व्यवस्थापक मा. आदित्य फत्तेपुरकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत
.सामाजिक परिवर्तनासाठी योगदान देणाऱ्यांचा गौरव
समाजातील विविध जाती-धर्मांमध्ये सामाजिक ऐक्य निर्माण करणे, सामाजिक विषमता दूर करण्यासाठी जनजागृती करणे, संविधानिक मूल्यांचा प्रसार करणे आणि समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे.
सामाजिक, आर्थिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना यावेळी कृतज्ञता पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.समाजात समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाची भावना रुजविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत होणारी ही परिषद सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला बळ देणारी ठरणार आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनात बहुजन सत्यशोधक संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौरभ वाघमारे, महा.राज्य अध्यक्ष राजकुमार लांडगे महाराष्ट्र कार्याध्यक्ष हेमंत कांबळे, प्रवक्ते महेंद्र लंकेश्वर, डॉ. विश्वास वाघमारे, जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लोंढे, तालुकाध्यक्ष विनोद लोखंडे, युवक जिल्हाध्यक्ष अवि गायकवाड, युवा उपाध्यक्ष पांडुरंग चव्हाण, तालुका सचिव रवींद्र काकडे, तालुका उपाध्यक्ष महमद शेख अकलूज शहर अध्यक्ष अशोक कोळी, जिल्हा उपाध्यक्ष युवा सावता नवगिरे, ता.संपर्कप्रमुख रोहिदास तोरणे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते सहभागी आहेत.

या सामाजिक ऐक्य परिषद व कृतज्ञता पुरस्कार वितरण सोहळ्यास नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.






