ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त अकलूज येथे मिठाई वाटपाचा उपक्रम उत्साहात संपन्न

अकलूज, दि. २७ : (रणजितदादा गायकवाड )इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी करण्यात आली.
यानिमित्त अकलूज येथे मिठाई वाटपाचा सुंदर आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा उपक्रम उत्साहात संपन्न झाला. प्रेम, बंधुभाव, मानवता आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या पैगंबरांच्या विचारांना अभिवादन करत नागरिकांना मिठाईचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी उपस्थित नागरिकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले
.या कार्यक्रमाचे उद्घाटन माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष मा. विठ्ठलराव गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले
. यावेळी उपस्थितांनी एकमेकांना ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा देत सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला.

हा उपक्रम HKGN मेडिकल, अकलूजचे रमजानभाई मुलानी यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला होता.

यावेळी संतोष इंगळे, विजय जगताप, प्रदीप भोरे, गिरीशदादा एकतपुरे, अमरसिंह गायकवाड, अनिल कदम, आफताब मुजावर, सूरज शेख, आमिर मुलानी, अकबर शेख, सागरनाना जगदाळे, राजवर्धन खताल ,सरफराज मुलानी आदी मान्यवर उपस्थित होते.
नागरिकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करत आयोजकांचे अभिनंदन केले.
मिठाईच्या गोडव्याबरोबरच पैगंबरांच्या मानवता, प्रेम आणि बंधुभावाच्या संदेशाचा प्रसार करणारा हा उपक्रम अकलूजमध्ये सामाजिक एकतेचे सुंदर उदाहरण ठरला.
🌹 “पैगंबरांचा संदेश मानवतेचा, प्रेमाचा आणि बंधुभावाचा…ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने मिठाईच्या गोडव्याने नाती आणखी दृढ झाली!” 🌹






