सौ. सुवर्णाताई हांडे यांची आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ च्या महामुंबई अध्यक्ष महिला आघाडीपदी निवड
मुंबई : (प्रतिनिधी )आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ, मुंबईचे अध्यक्ष श्री. राजेश काकडे यांच्या शिफारशीनुसार सौ. सुवर्णाताई हांडे यांची ‘महामुंबई अध्यक्ष महिला आघाडी’ पदी निवड करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी तसेच संघटनेच्या बळकटीकरणासाठी सौ. सुवर्णाताई हांडे यांचे योगदान मोलाचे राहिले आहे.
मुंबई महानगर परिसरात महिला आघाडीच्या माध्यमातून संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी त्यांची निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

सौ. हांडे यांच्या निवडीबद्दल संस्थापक अध्यक्ष डॉ. कृषिराज टकले पाटील.राष्ट्रीय अध्यक्ष स्वराज्यभूषण एम. के. दीपसागर सागर जी, गौरव अध्यक्ष मराठा रामनारायण, आंतरराष्ट्रीय सचिव इ.आ. राजे उज्वलसिंह गायकवाड, राष्ट्रीय उपाध्यक्ष दिनेश राजवत (कर्मी), राष्ट्रीय सरचिटणीस राजवीर सिंह, राष्ट्रीय चिटणीस सलील सूर्यवंशी आणि महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा कोकिळा पवार यांनी अभिनंदन केले आहे.
यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी सौ. सुवर्णाताई हांडे यांना पुढील कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा देत, त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील महिला आघाडी अधिक मजबूत होईल आणि मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसाठी संघटितपणे कार्याला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
नवीन जबाबदारीच्या माध्यमातून समाजातील महिला, विद्यार्थी, तरुण तसेच विविध घटकांच्या प्रश्नांना संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी सौ. हांडे प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली
.सौ. सुवर्णाताई हांडे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीसाठी स्वाभिमानी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
जय भवानी! जय शिवराय! जय स्वाभिमानी! 🚩






