• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

अकलूजमध्ये मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; पुढील आंदोलन ‘वर्षा’ बंगल्यावर

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
August 14, 2026
in आपले शहर
0
अकलूजमध्ये मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; पुढील आंदोलन ‘वर्षा’ बंगल्यावर
0
SHARES
195
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूजमध्ये मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; पुढील आंदोलन ‘वर्षा’ बंगल्यावर

अकलूज : (प्रतिनिधी )“मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा पूर्ण केला असून, सरकारच्या कोणत्याही आश्वासनावर जगत नाही. हैदराबाद, औंध आणि सातारा गॅझेटची तातडीने अंमलबजावणी करून मराठा समाजाला हक्क द्यावा,” अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली.

मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्रे अडवून त्यांना वेठीस धरले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला

.अकलूज येथे आयोजित पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी राज्य सरकारसह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार संजय शिरसाट यांच्यावर जोरदार टीका केली.

“भावाला व्हॅलिडिटी द्यायची आणि बहिणीची रद्द करायची, ही कोणती शासकीय प्रक्रिया आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

बावनकुळे, शिरसाटांवर गंभीर आरोप

मराठ्यांच्या जात पडताळणी प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासाठी बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना पत्रे दिल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. “मराठा समाजाचे वाटोळे बावनकुळे आणि संजय शिरसाट यांनी केले आहे. या दोघांनी समाजावर अन्याय करून पाप केले असून, त्याची परतफेड त्यांना करावी लागेल,” असे ते म्हणाले.

“बावनकुळेंमुळे देवेंद्र फडणवीस आणि शिरसाटांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत आले आहेत.

सरकार ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रे मराठ्यांना न देण्याच्या तयारीत आहे,” असा दावाही त्यांनी केला.

पुढील आंदोलन ‘वर्षा’वर

मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकारने अडवणूक सुरूच ठेवली तर पुढील आंदोलन थेट मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर करण्यात येईल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

“मी राज्यातील कोणत्याही एका भागासाठी लढत नसून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांसाठी लढत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

मराठा नेत्यांना इशारा

सर्व पक्षांतील मराठा नेत्यांनी ताकदीने समाजाची बाजू मांडावी, असे आवाहन करत जरांगे पाटील यांनी नेत्यांना इशाराही दिला. “मराठा समाज तुमच्यापासून बाजूला गेला, तर तुमचा बाजार उठला म्हणून समजा,” असे ते म्हणाले.

विविध समाजांमध्ये सरकारविरोधात असंतोष असल्याचा दावा

राज्यातील शेतकरी, आदिवासी, दलित, मुस्लिम आणि धनगर समाजात सरकारविरोधात मोठा असंतोष असल्याचा दावा त्यांनी केला. “सरकारचा अहंकार जनता उतरवेल,” असेही ते म्हणाले.

गावखेड्यांमध्ये मराठा, धनगर, दलित, मुस्लिम आणि आदिवासी समाजांमध्ये कोणताही जातीय वाद नसून राजकारणीच वाद असल्याच्या अफवा पसरवत असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

धनगर समाजाबाबत सकारात्मक भूमिका

“मला आजही गोरगरीब धनगरांची माया वाटते. मी कधीही धनगर समाजावर टीका केलेली नाही,” असे सांगत धनगर नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून समाजाच्या हितासाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले

.छत्रपतींच्या गादीचा सन्मान करणे कर्तव्य

छत्रपतींच्या गादीचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगत कोल्हापूरच्या छत्रपतींनी कोणती राजकीय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

मात्र, त्यांनी मराठा समाजासाठी काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, कुणबी प्रमाणपत्रे रद्द होतील किंवा मराठा आरक्षण टिकणार नाही, असे गैरसमज पसरवून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न सरकारमधील काही लोकांकडून होत असल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी केला.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा संपन्न; मध्यरात्रीपर्यंत सभा, ठिकठिकाणी जेसीबी-क्रेनने भव्य स्वागत

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा संपन्न; मध्यरात्रीपर्यंत सभा, ठिकठिकाणी जेसीबी-क्रेनने भव्य स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In