**संघर्ष योद्धा न्यूजच्या बातमीचा प्रभाव! इंदापूर तालुक्यातील पवारवाडी परिसरातील धोकादायक विहिरींना बॅरिकेड, रस्त्याच्या साईडपट्ट्या भरण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात*
*इंदापूर (विठ्ठल काळे )इंदापूर तालुक्यातील उद्धट मानकरवाडी ते कर्दनवाडी या सुमारे ८ किलोमीटर लांबीच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या रस्त्यावरील गंभीर सुरक्षेच्या प्रश्नाची संघर्ष योद्धा न्यूज पोर्टलने दोन दिवसांपूर्वी सविस्तर दखल घेतल्यानंतर संबंधित यंत्रणा आणि ठेकेदार प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

या वृत्ताची तात्काळ दखल घेत रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरींना बॅरिकेड उभारण्याचे तसेच अनेक ठिकाणी अपूर्ण राहिलेल्या साईडपट्ट्या भरण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.
उद्धट मानकरवाडी ते कर्दनवाडी हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुमारे पाच कोटी रुपये खर्चून मे. व्ही. एच. खत्री कन्स्ट्रक्शन प्रा. लि., बारामती या ठेकेदारामार्फत बांधण्यात आला
. मात्र, काम पूर्ण होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही अनेक ठिकाणी साईडपट्ट्या न भरल्याने वाहनचालकांसह नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.
विशेषतः पवारवाडी गावाजवळील वळणावर रस्त्यालगत असलेली विहीर ही मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारी ठरत होती.तसेच दत्तनगर, करकरे वस्ती या ठिकाणी देखील विहीर आहे.या मार्गावरून ग्रामस्थ, शेतकरी, महिला तसेच शाळकरी विद्यार्थी दररोज ये-जा करतात.
गावात जाण्यासाठी हा प्रमुख मार्ग असल्याने येथे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी सुरक्षेच्या उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याची मागणी नागरिकांनी केली होती.
या पार्श्वभूमीवर संघर्ष योद्धा न्यूज पोर्टलने या गंभीर प्रश्नाला वाचा फोडत संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधले. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराने तातडीने हालचाल करत विहिरींना सुरक्षित बॅरिकेड उभारण्याचे तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साईडपट्ट्या भरण्याचे काम सुरू केले आहे
.दरम्यान, वेळेत दखल घेतल्यामुळे भविष्यात होऊ शकणाऱ्या संभाव्य अपघातांना आळा बसण्यास मदत होणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या संघर्ष योद्धा न्यूज पोर्टलच्या वृत्ताची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष काम सुरू झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात असून, उर्वरित कामही दर्जेदार आणि लवकर पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे
.#बातमीचा_प्रभाव #संघर्ष_योद्धा_न्यूज #SangharshYoddhaNews #जनतेचा_आवाज #निर्भीड_पत्रकारिता #इंदापूर #पवारवाडी #उद्धट_मानकरवाडी #कर्दनवाडी #प्रधानमंत्री_ग्राम_सडक_योजना #रस्तेसुरक्षा #साईडपट्टी #बॅरिकेड #विहीर_सुरक्षा #ग्रामीण_विकास #जनहित #लोकहित #महाराष्ट्र_न्यूज #ग्राउंड_रिपोर्ट #PositiveImpact #NewsImpact







