सेवानिवृत्त शिक्षक सुहास ओव्हाळ यांचा लोकमंगल पतसंस्थेतर्फे सपत्नीक सत्कार
अकलूज, दि. २ जून २०२६ : लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर यांच्या अकलूज शाखेच्या वतीने गोपाळराव देव प्रशाला, माळशिरस येथील ज्येष्ठ शिक्षक तथा नुकतेच सेवानिवृत्त झालेले श्री. सुहास नामदेव ओव्हाळ यांचा सपत्नीक सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
शिक्षण क्षेत्रात अनेक वर्षे प्रामाणिकपणे व निष्ठेने सेवा बजावत विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिल्याबद्दल श्री. ओव्हाळ यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी त्यांना शाल, श्रीफळ, हार तसेच लोकमंगल संस्थेचा वार्षिक अहवाल भेट देऊन गौरविण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील आयुष्यासाठी निरोगी, आनंदी व यशस्वी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी शिक्षक हा समाजाचा आधारस्तंभ असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याला दिशा देण्याचे महान कार्य शिक्षक करत असतात, असे सांगितले.
श्री. सुहास ओव्हाळ यांनी आपल्या सेवाकाळात शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त व विद्यार्थीकेंद्री दृष्टिकोन जपत अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले. या सत्कार समारंभास पंढरपूर विभागाचे विभागीय अधिकारी दिगंबर जाधव साहेब, जगदीश पाटील, अकलूज शाखेचे शाखाधिकारी तसेच प्रशांत चव्हाण, कोमल धुमाळ, तेजश्री गिरमे, रोहन म्हसवडे आदी कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांनी श्री. ओव्हाळ यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव केला.समारंभ आनंदी व कौटुंबिक वातावरणात संपन्न झाला.
यावेळी उपस्थितांनी सेवानिवृत्त शिक्षकांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली






