झंजेवाडीत पाणी, घरकुल घोटाळ्यासह १६ मागण्यांसाठी काँग्रेसचे आमरण उपोषण; धनाजी मस्के ६ मे पासून बसणार उपोषणाला ग्रामपंचायत कारभाराच्या निषेधार्थ पोलीस ठाण्यात दिले निवेदन, प्रशासनाला दिला इशारा
अकलूज(प्रतिनिधी )ग्रामपंचायत झंजेवाडीच्या भोंगळ कारभाराविरोधात आणि ग्रामस्थांच्या विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस धनाजी श्रीपती मस्के हे ६ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत

. याबाबत त्यांनी माळशिरस पोलीस ठाण्यात निवेदन देऊन परवानगी मागितली आहे.१६ प्रमुख मागण्या, प्रशासनावर गंभीर आरोपधनाजी मस्के यांनी दिलेल्या निवेदनात ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर आरोप केले आहेत.
जल जीवन मिशनच्या कामात भ्रष्टाचार, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, घरकुल योजनेतील घोटाळा, कार्यालयात अधिकाऱ्यांची अनुपस्थिती अशा १६ ज्वलंत मागण्यांसाठी हे उपोषण होणार आहे.
मुख्य मागण्या 1. पाणी प्रश्न जल जीवन मिशनच्या कामाची चौकशी करावी. एकनाथ मारकड तालीम जवळील टाकीचे पाणी तात्काळ सुरू करून दररोज घरोघरी पाणी द्यावे. 2. घरकुल घोटाळा घरकुल योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. गरजूंनाच लाभ मिळाला का, याची तपासणी करावी .3. कारभारात पारदर्शकता ग्रामपंचायत कार्यालयात व आवारात सीसीटीव्ही लावावेत. कर्मचाऱ्यांची व ग्रामसेवकाची बायोमेट्रिक हजेरी घ्यावी. कार्यालय रोज उघडावे. 4. मूलभूत सुविधा गावात २४ तास सिंगल फेज वीज द्यावी. शौचालय सुरू करावे. संगणक-प्रिंटर दुरुस्त करावा. 5. जमिनीचा प्रश्नगावठाण मोजणी व सिटी सर्व्हे करावा. विकासकामांसाठी नागरिकांच्या जागा परवानगीशिवाय घेऊ नयेत. 6. इतर मागण्या ग्रामसभा नियमित घ्यावी. अहिल्यादेवी पुतळ्याजवळील पत्रा शेडच्या कामाची चौकशी करावी.महिन्यांपासून पाठपुरावा, पण दखल नाही
गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही ग्रामपंचायत, पंचायत समिती व प्रशासनाकडे तोंडी व लेखी पाठपुरावा करत आहोत. पण एकाही मागणीची दखल घेतली नाही.
शेवटी नाईलाजाने लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे,असे धनाजी मस्के यांनी सांगितले
.पोलीस बंदोबस्ताची मागणी
उपोषणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करावा, अशी विनंतीही मस्के यांनी निवेदनात केली आहे.
जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या आंदोलनामुळे झंजेवाडीतील राजकीय वातावरण तापले असून प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






