खंडाळीच्या विकासासाठी भरीव निधी देणार :खा. धैर्यशील मोहिते-पाटील
खंडाळी (वार्ताहर) खंडाळी गावच्या विकासासाठी भरीव निधी देणार असल्याचे प्रतिपादन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भोसलेवस्ती-खंडाळी येथे जल जीवन मिशन अंतर्गत भोसले वस्ती येथे विहीर खोदणे व विविध विकास कामाचा शुभारंभ प्रसंगी केले
. पुढे बोलताना मोहित-पाटील म्हणाले, सहकार महर्षी पासुन खंडाळी गाव मोहिते-पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहे
. मोहिते-पाटील कुटुंबातील प्रत्येक सदस्य खंडाळी गावच्या विकासासाठी नेहमीच तत्पर असतो. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीर उभा असुन जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयन्त करावेत असे ते शेवटी म्हणले.
विहिरीसाठी स्वतःची दोन गुंठे जागा देणारे युवा शेतकरी नामदेव भोसले यांचे खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आभार मानले.
यावेळी माजी सरपंच रावसाहेब भोसले,चेअरमन राजेंद्र पताळे, डॉ. सुभाष कटके-पाटील,बाबुराव कदम,सुरेश सुरवसे, उपसरपंच नितीन थोरात,गटनेते अमर रिसवडकर,अविनाश पताळे, नारायण पताळे, मदन भोसले,महेश पताळे, गणेश भोसले,नामदेव भोसले, शंकर जाधव, समाधान पताळे,ओंकार भोसले,ब्रम्हदेव मस्के,सोनू भोसले,धनाजी जाधव व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.






