• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

अकलूजमध्ये ‘विराट हिंदू संमेलन’ उत्साहात पार; पारंपरिक वैभव, भक्तीमय वातावरणात भव्य सोहळा

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
April 1, 2026
in आपले शहर
0
अकलूजमध्ये ‘विराट हिंदू संमेलन’ उत्साहात पार; पारंपरिक वैभव, भक्तीमय वातावरणात भव्य सोहळा
0
SHARES
171
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूजमध्ये ‘विराट हिंदू संमेलन’ उत्साहात पार; पारंपरिक वैभव, भक्तीमय वातावरणात भव्य सोहळा

अकलूज (प्रतिनिधी) – अकलूज नगरीत सोमवार, दि. ३० मार्च २०२६ रोजी पार पडलेले ‘विराट हिंदू संमेलन’ धार्मिक उत्साह, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक एकात्मतेचा संगम घडवणारा ठरला.

सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित या भव्य कार्यक्रमाने उपस्थितांवर अविस्मरणीय ठसा उमटवला.कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला सभामंडप पारंपरिक सजावटीने नटलेला होता. सभामंडपात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा देखावा साकारण्यात आला होता, तर शिवरायांची भव्य मूर्ती आणि प्रभू श्रीरामांची आकर्षक प्रतिमा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. मशाली, भगवे ध्वज आणि पारंपरिक सजावटीमुळे संपूर्ण परिसरात भक्तीमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते.

या संमेलनाची सुरुवात गांधी चौकातून काढण्यात आलेल्या भव्य स्वागत मिरवणुकीने झाली. या मिरवणुकीत ह.भ.प. अनिल महाराज देवळेकर आणि श्रीपादतीर्थ स्वामी महाराज यांचे जिप्सीद्वारे स्वागत करण्यात आले. ढोल-ताशे, हलगी वादन आणि जयघोषांच्या गजरात ही मिरवणूक जय शंकर उद्यानापर्यंत अत्यंत उत्साहात पार पडली.जय शंकर उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,

तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना हार अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर शिवरायांची पालखी विजय चौकाच्या दिशेने मार्गस्थ झाली.या पालखी सोहळ्यात लहान वारकरी मंडळ, भगवे ध्वज, भजनी मंडळ आणि पारंपरिक वाद्यवृंदाचा सहभाग होता.

“जय जय रघुवीर समर्थ” आणि “शिवाजी महाराज की जय” अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. विजय चौकात पोहोचल्यावर पालखीचे फुलांच्या वर्षावात भव्य स्वागत करण्यात आले.

अबदागिरी, मशाली आणि भगवे ध्वजांनी सजलेले पालखीचे रूप सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले.विजय चौकात आगमनानंतर महिलांनी अनिल महाराज देवळेकर व श्रीपादतीर्थ स्वामी महाराज यांचे पारंपरिक औक्षण करून स्वागत केले. त्यानंतर गाईचे पूजन करण्यात आले. शंखनाद आणि शिवगर्जनेने संपूर्ण परिसर दणाणून गेला, ज्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाची लाट उसळली.

कार्यक्रमाच्या पुढील सत्रात प्रस्तावना सादर करून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यात आला. श्रीपादतीर्थ स्वामी महाराज यांनी आपल्या आशीर्वचनातून धर्म, संस्कार आणि समाजातील एकतेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर मनीष बोत्रे यांनी ‘पंच परिवर्तन’ या विषयावर मार्गदर्शन करत समाज परिवर्तनासाठी आवश्यक मूल्यांवर प्रकाश टाकला.

याच प्रसंगी ‘संघ शताब्दी विशेषांक’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. हिंदू इतिहास आणि संस्कृतीचा प्रसार व्हावा या उद्देशाने पुस्तक विक्री स्टॉलही उपलब्ध करून देण्यात आला होता.कार्यक्रमात ह.भ.प. अनिल महाराज देवळेकर यांनी ‘हिंदू समाज प्रबोधन’ या विषयावर प्रभावी आणि ओजस्वी व्याख्यान दिले. त्यांनी आपल्या भाषणातून एकता, संस्कार, राष्ट्रभक्ती आणि धर्मजागृतीचा संदेश देत उपस्थितांना प्रेरित केले.या संमेलनाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

यामध्ये डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील, माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते, अकलूज नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या धर्मपत्नी देवण्यादेवी मोहिते पाटील यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच सकल हिंदू समाजाचे संयोजक संजय एकतपुरे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रताप (दादा) साळुंखे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मनीष बोत्रे यांचीही उपस्थिती लक्षणीय होती.कार्यक्रमाची सांगता प्रेरणा मंत्र आणि ध्येय मंत्राने करण्यात आली. शेवटी उपस्थित सर्व हिंदू बंधू-भगिनींसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

एकूणच, पारंपरिक दिमाख, धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक एकात्मतेचा सुंदर संगम घडवणारे ‘विराट हिंदू संमेलन’ अकलूजमध्ये अत्यंत यशस्वी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यक्रमासाठी तन-मन-धन अर्पण करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे सकल हिंदू समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
संघर्ष योद्धा न्यूज वृत्तमालिका*                                     “*लग्न जमेना… कळी सुटेना*!”                                           *​लग्नाचा सुटता सुटेना पेच; आता बदलावी लागेल आपली मानसिकता*!                                                        *सामंजस्य आणि साधेपणा हाच सुखी विवाहाचा मंत्र.*       *क्रमशः भाग १०*​

संघर्ष योद्धा न्यूज वृत्तमालिका* "*लग्न जमेना... कळी सुटेना*!" *​लग्नाचा सुटता सुटेना पेच; आता बदलावी लागेल आपली मानसिकता*! *सामंजस्य आणि साधेपणा हाच सुखी विवाहाचा मंत्र.* *क्रमशः भाग १०*​

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In