*संघर्ष’चा दणका! 28 दिवसांच्या पाठपुराव्याला यश अकलूज–वेळापूर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरु*. *क्रमशः भाग 29*
अकलूज (प्रतिनिधी):गेल्या 28 दिवसांपासून *‘संघर्ष योद्धा न्यूज’*ने केलेल्या धडाकेबाज आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यापुढे अखेर प्रशासनाला झुकावे लागले आहे.
अकलूज–वेळापूर रस्त्यावर मृत्यूचे सापळे ठरलेल्या धोकादायक खड्ड्यांविरोधात छेडलेल्या या लढ्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) अखेर जागा झाला असून, रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम आता युद्धपातळीवर सुरू झाले आहे.
*‘संघर्ष योद्धा न्यूज’*च्या सातत्यपूर्ण पत्रकारितेमुळे आणि नागरिकांच्या तीव्र रोषामुळे प्रशासनाला एसी केबिन सोडून प्रत्यक्ष रस्त्यावर उतरावे लागले. त्यामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
*संघर्ष’चा धडाका; प्रशासनाला जाग*15 फेब्रुवारीपासून सलग 28 भागांमधून *‘संघर्ष योद्धा न्यूज’*ने अकलूज–वेळापूर मार्गावरील भीषण परिस्थिती उघडकीस आणली. रस्त्यावर पडलेले खोल खड्डे अपघातांचे प्रमुख कारण ठरत होते.
या सातत्यपूर्ण वृत्तांकनामुळे प्रशासनावर प्रचंड दबाव निर्माण झाला आणि अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला कामाला लागावे लागले
.*आभार… पण लढा अजून संपलेला नाही*
खड्डे बुजविण्याचे काम सुरू केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. मात्र नागरिकांच्या मते ही केवळ तात्पुरती मलमपट्टी असून, कायमस्वरूपी उपाययोजना होणे अत्यावश्यक आहे.
*संघर्ष’चा इशारा थातूरमातूर काम चालणार नाही*
खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले असले तरी आता *‘संघर्ष योद्धा न्यूज’*ची नजर कामाच्या दर्जावर असणार आहे.
*निकृष्ट काम नको :*
खड्ड्यांमध्ये केवळ माती किंवा निकृष्ट खडी टाकून बोळवण करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याविरोधात पुन्हा तीव्र आंदोलन उभारले जाईल.
*डांबरीकरणाची मागणी*
पावसाळा तोंडावर असल्यामुळे केवळ खड्डे बुजवून वेळ मारून नेली, तर पहिल्याच पावसात रस्ता पुन्हा खराब होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे संपूर्ण रस्त्याचे दर्जेदार डांबरीकरण (Resurfacing) करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
*हा जनतेचा विजय*
हा विजय *‘संघर्ष योद्धा न्यूज’*च्या निर्भीड पत्रकारितेचा आणि अकलूज–वेळापूर परिसरातील नागरिकांच्या एकजुटीचा आहे.
प्रशासनाने आता कामात कोणताही खंड न पडू देता संपूर्ण रस्ता दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावा, अन्यथा पुढील संघर्ष अधिक तीव्र होईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
“प्रशासनाने कामाला सुरुवात केली, ही समाधानाची बाब आहे. पण हे काम दर्जेदार असावे. केवळ आकडे पूर्ण करण्यासाठी खड्डे बुजवले जात असतील, तर गाठ आमच्याशी आहे!” *संपादक*संघर्ष योद्धा न्यूज* *क्रमशः भाग 29*
*#संघर्षयोद्धान्यूज#SangharshYoddhaNews#अकलूज#वेळापूररस्ता#रस्त्यावरीलखड्डे#जनतेचाविजय#संघर्षचापाठपुरावा#अखेरप्रशासनजागे#PWD#RoadRepair#AklujNews#VelapurRoad#PublicIssue#JournalismPower#व्हॉइसऑपीओतले🚨 अकलूज – वेळापूर रस्ता : संघर्ष सुरूच 🚨अकलूज – वेळापूर रस्त्यावरील गंभीर समस्यांविरोधात १५ फेब्रुवारीपासून संघर्ष योद्धा न्यूज पोर्टल सातत्याने वृत्तमालिका प्रसिद्ध करत आहे.👥 नागरिकांची व्यथा स्पष्ट आहे —“दररोजचा प्रवास म्हणजे जीवघेणा संघर्ष!”खड्डे, अपूर्ण कामे, उडणारी धूळ, वाहतूक कोंडी आणि वाढता अपघातांचा धोका यामुळे विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवासी त्रस्त झाले आहेत. रुग्णवाहिकांनाही वेगाने धावणे कठीण होत असल्याची तक्रार समोर येत आहे.🙏 अनेक नागरिकांनी प्रतिक्रिया देत आभार व्यक्त केले —“कुणीतरी आमचा आवाज उठवतोय!”🔥 आम्ही थांबणार नाही!रस्ता पूर्ण आणि सुरक्षित होईपर्यंत ही लढाई सुरूच राहील. घोषणांपेक्षा प्रत्यक्ष काम होईपर्यंत सातत्याने प्रश्न विचारले जातील.➡️ या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यानी आपले अनुभव, तक्रारी व सूचना आम्हाला पाठवा.हा लढा आपल्या सर्वांचा आहे.📲 ७८४१८४७४५८✊ एकत्र येऊया, आवाज बुलंद करूया!खड्डेमुक्त रस्ता हा आमचा हक्क आहे!






