• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

लग्नाआधीच भांडाफोड! ‘दक्ष वैद्य’ निघाला इक्बाल शेख; बनावट कागदपत्रांवर तरुणीशी प्रेमसंबंध 💥

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
March 14, 2026
in आपले शहर
0
लग्नाआधीच भांडाफोड! ‘दक्ष वैद्य’ निघाला इक्बाल शेख;    बनावट कागदपत्रांवर तरुणीशी प्रेमसंबंध 💥
0
SHARES
413
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लग्नाआधीच भांडाफोड! ‘दक्ष वैद्य’ निघाला इक्बाल शेख; बनावट कागदपत्रांवर तरुणीशी प्रेमसंबंध 💥

नातेपुते(प्रतिनिधी )स्वतःला ‘दक्ष केशव वैद्य’ असे सांगत बनावट आधारकार्ड व पॅनकार्डच्या आधारे एका तरुणीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करणाऱ्या तरुणाचा खरा चेहरा अखेर उघडकीस आला आहे.

लग्नाची तयारी सुरू असतानाच तो प्रत्यक्षात इक्बाल शेख असल्याचे समोर आल्यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

या प्रकरणी नातेपुते पोलीस ठाणे पोलिसांनी सखोल तपास करत आरोपीला ११ मार्च रोजी अटक केली असून माळशिरस न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नातेपुते येथील २५ वर्षीय तरुणी पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करते. सप्टेंबर २०२५ च्या सुमारास तिची आरोपीशी ओळख झाली. आरोपीने स्वतःचे नाव दक्ष केशव वैद्य (रा. उंबरे, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर; सध्या रा. बाणेर-पाषाण लिंक रोड, पुणे) असे सांगून तिच्याशी मैत्री वाढवली.

स्वतः हिंदू असल्याचे भासवण्यासाठी त्याने बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड तयार केले होते. सुरुवातीला साध्या ओळखीपासून सुरू झालेला संवाद हळूहळू मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमसंबंधांत बदलला.काही महिन्यांतच आरोपीने तरुणीवर विश्वास संपादन करत तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्याचवेळी त्याने तरुणीच्या आई-वडील व नातेवाइकांशीही संपर्क साधत स्वतःबद्दल विविध खोटी माहिती दिली. आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तरुणीच्या कुटुंबीयांनीही विवाहाबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. परिणामी दोन्ही कुटुंबीयांमध्ये लग्नाच्या तयारीची चर्चा सुरू झाली होती.

पहिल्या पत्नीचा फोन; संशयाची पाल चुकचुकली

दरम्यान, काही दिवसांपूर्वी तरुणीच्या आईला पुण्यातून एका अज्ञात महिलेचे वारंवार फोन येऊ लागले. त्या महिलेने सांगितले की संबंधित व्यक्ती विवाहित असून तो हिंदू नसून मुस्लिम आहे. त्याच्यापासून तिला दोन अपत्येही असल्याची माहिती तिने दिली

. या फोनमुळे तरुणीच्या कुटुंबीयांना संशय आला.यानंतर तरुणीच्या चुलत्याने आरोपीने सांगितलेल्या पत्त्यानुसार उंबरे (ता. राहुरी) येथे जाऊन स्थानिक पोलिस पाटील व ग्रामस्थांकडे चौकशी केली. मात्र त्या नावाचे कोणतेही कुटुंब गावात राहत नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे आरोपीने दिलेली माहिती खोटी असल्याचे उघड होऊ लागले.

पुढील चौकशीत त्याने वापरलेली कागदपत्रेही बनावट असल्याचे समोर आले. फोन करणारी महिला हीच त्याची पत्नी असल्याचे आणि तिच्यासोबत त्याचा आंतरधर्मीय विवाह झाल्याची बाबही पुढे आली.

. पोलिसांचा सखोल तपास

या प्रकारानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी तातडीने नातेपुते पोलीस ठाणे येथे संपर्क साधून तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. पोलिसांनी तांत्रिक माहिती व कागदपत्रांची पडताळणी करत आरोपीची खरी ओळख उघडकीस आणली. त्यानंतर १० मार्च रोजी त्याला ताब्यात घेण्यात आले. पुढील दिवशी त्याला माळशिरस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली.

अशी मिळविली सहानुभूती

सहानुभूती मिळवण्यासाठी खोट्या गोष्टीतरुणी व तिच्या कुटुंबीयांचा विश्वास जिंकण्यासाठी आरोपीने अनेक खोट्या गोष्टी सांगितल्या होत्या. कोरोनाच्या काळात आई-वडील वारल्याचे, भाऊ मुंबईत नोकरी करत असल्याचे, तसेच गावी सहा एकर बागायती शेती व स्वतःचे घर असल्याचे तो सांगत होता. आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि कुटुंबवत्सल असल्याचा आभास निर्माण करून त्याने तरुणीच्या कुटुंबीयांची सहानुभूती मिळवली होती. याच विश्वासाच्या आधारावर विवाहाची तयारीही सुरू झाली होती. मात्र काही दिवसांतच सत्य समोर आल्यानंतर तरुणी व तिच्या वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली.

पोलिसांचा सावधगिरीचा इशारा

या घटनेच्या पार्श्वभूमीवर सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. ग्रामीण भागातही अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना घडत असल्याने नवीन ओळखी करताना संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी, कुटुंबीयांची माहिती आणि कागदपत्रांची पडताळणी करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

तरुण-तरुणींनी तसेच पालकांनीही अशा बाबतीत सतर्कता बाळगल्यास अशा प्रकारच्या घटनांना आळा बसू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

या घटनेमुळे ग्रामीण भागातही ओळखीच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सोशल मीडियावर किंवा वैयक्तिक ओळखीमधून संबंध प्रस्थापित करताना संबंधित व्यक्तीची खरी ओळख, कुटुंबीयांची माहिती तसेच कागदपत्रांची पडताळणी करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास नातेपुते पोलीस ठाणे चे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
जीसीसी टीबीसी परीक्षेत कोमल गोसावी ९९% गुण मिळवून सोलापूर जिल्ह्यात द्वितीय व माळशिरस तालुक्यात प्रथम, मल्हार कुदळे द्वितीय व निर्जरा माने तृतीयअंध विद्यार्थी जिब्रान तांबोळी याचे ९५% ग्रुण प्राप्त करत उल्लेखनीय यशभक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूजच्या विद्यार्थ्यांचे उज्वल यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In