*अकलूज–वेळापूर रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी तीव्र* *मलमपट्टी नको*,*आता शस्त्रक्रिया हवी* *कायमस्वरूपी उपाय करा*– *नागरिकांचा सूर* *क्रमशः भाग -25*
अकलूज (प्रतिनिधी ): अकलूज ते वेळापूर या महत्त्वाच्या मार्गाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली असून ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पावसाळ्यानंतर रस्त्याची परिस्थिती अधिक गंभीर बनली असून काही ठिकाणी रस्ता खचल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे या रस्त्याची केवळ तात्पुरती डागडुजी न करता संपूर्ण मजबुतीकरण करून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
अकलूज–वेळापूर हा मार्ग परिसरातील अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहतूक करणारी वाहने ये-जा करतात. परिसरातील शेतकरी आपला शेतीमाल बाजारपेठेत नेण्यासाठी, व्यापारी व्यवहारासाठी तसेच विद्यार्थी शिक्षणासाठी या मार्गावर अवलंबून आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाल्याने दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.सध्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून वाहन चालवताना चालकांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्डे दिसत नाहीत आणि अचानक वाहन खड्ड्यात गेल्याने वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच अपघात होण्याची शक्यता वाढत आहे.
विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत असल्याचे नागरिकांनी सांगितले. रात्रीच्या वेळी या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक वेळा किरकोळ अपघातही झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
स्थानिक नागरिकांच्या मते, दरवर्षी पावसाळ्यानंतर या रस्त्यावर तात्पुरती डागडुजी केली जाते. मात्र काही दिवसांतच पुन्हा खड्डे पडतात आणि परिस्थिती पूर्ववत होते. त्यामुळे दरवर्षी केवळ मलमपट्टी करण्यापेक्षा रस्त्याचे संपूर्ण मजबुतीकरण करून दर्जेदार काम करणे गरजेचे आहे.
“मलमपट्टी नको, आता शस्त्रक्रिया हवी,” अशीच भावना अनेक वाहनचालक आणि नागरिकांनी व्यक्त केली आहे.या रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे केवळ वाहनचालकांनाच नव्हे तर शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतीमाल वाहतूक करताना वाहनांची गती कमी करावी लागते, त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच व्यापाऱ्यांनाही मालाची वाहतूक करताना अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन संपूर्ण रस्त्याचे मजबुतीकरण व नूतनीकरण करावे, अशी मागणी नागरिक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून होत आहे.
योग्य वेळी उपाययोजना न झाल्यास नागरिकांकडून आंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
त्यामुळे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत. *क्रमशः भाग 25-#अकलूज#वेळापूर#अकलूजवेळापूररस्ता#रस्तादुरुस्ती#खड्डेमुक्तरस्ते#नागरिकांचीमागणी#रस्त्याचीदुरवस्था#सोलापूरजिल्हा#वाहनचालकांचीअडचण#कायमस्वरूपीउपाय#मलमपट्टीनकोशस्त्रक्रियाहवी
🚨 अकलूज – वेळापूर रस्ता : संघर्ष सुरूच 🚨
अकलूज – वेळापूर रस्त्यावरील गंभीर समस्यांविरोधात १५ फेब्रुवारीपासून संघर्ष योद्धा न्यूज पोर्टल सातत्याने वृत्तमालिका प्रसिद्ध करत आहे. 👥 नागरिकांची व्यथा स्पष्ट आहे —“दररोजचा प्रवास म्हणजे जीवघेणा संघर्ष!”खड्डे, अपूर्ण कामे, उडणारी धूळ, वाहतूक कोंडी आणि वाढता अपघातांचा धोका यामुळे विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवासी त्रस्त झाले आहेत. रुग्णवाहिकांनाही वेगाने धावणे कठीण होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत .🙏 अनेक नागरिकांनी प्रतिक्रिया देत आभार व्यक्त केले —“कुणीतरी आमचा आवाज उठवतोय!” 🔥 आम्ही थांबणार नाही!रस्ता पूर्ण आणि सुरक्षित होईपर्यंत ही लढाई सुरूच राहील. घोषणांपेक्षा प्रत्यक्ष काम होईपर्यंत सातत्याने प्रश्न विचारले जातील. ➡️ या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांनी आपले अनुभव, तक्रारी व सूचना आम्हाला पाठवा.हा लढा आपल्या सर्वांचा आहे. 📲 ७८४१८४७४५८. ✊ *एकत्र येऊया, आवाज बुलंद करूया**खड्डेमुक्त रस्ता हा आमचा हक्क आहे!*






