*दत्तात्रय चव्हाण (गुरुजी) यांचे दुःखद निधन.*
अकलूज (प्रतिनिधी)लवंग (ता.माळशिरस) येथील दत्तात्रय सदाशिव चव्हाण गुरूजी यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.
मृत्यूसमयी ५९ वर्षांचे होते.इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक पदावरून नुकतेच निवृत झाले होते
.लवंग गावात एक प्रगतशील शेतकरी म्हणून नावलौकिक होता.
त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
त्यांचा शांत व संयमी स्वभाव तसेच संस्कारशील व्यक्तिमत्त्वामुळे या परिसरात ते सुप्रसिद्ध होते.
त्यांच्या अचानक जाण्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहेत.






