अकलूज नगरपरिषदतर्फे थकबाकीदारांसाठी ६ मार्च रोजी बैठकीचे आयोजन
अकलूज :(प्रतिनिधी )अकलूज नगरपरिषद हद्दीतील मालमत्ता कर, गाळा भाडे व पाणीपट्टी थकित असलेल्या मालमत्ताधारकांसाठी नगरपरिषदेतर्फे विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक ६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता नगरपरिषद सभागृहात होणार आहे.
या बैठकीमध्ये मालमत्ता कर, गाळा भाडे व पाणीपट्टीची आकारणी, त्यावरील व्याज, दंड तसेच थकबाकी वसुलीबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
तसेच नागरिकांच्या शंकांचे निरसनही करण्यात येणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अकलूज नगरपरिषद हद्दीतील ज्या मालमत्ताधारकांकडे कर व इतर देयके थकित आहेत, त्यांनी या बैठकीस उपस्थित राहून आपापल्या शंकांचे निरसन करून घ्यावे,
असे आवाहन नगराध्यक्षा मा. सौ. रेश्माताई अडगळे, उपनगराध्यक्ष मा. श्री. शिवतेजसिंह मोहिते पाटील तसेच मुख्याधिकारी मा. श्री. सचिन पाटील यांनी केले आहे.






