अकलूजमध्ये “माझे गाव, माझी जबाबदारी” अभियानांतर्गत वाहतूक कोंडीविरोधात विशेष उपक्रम सुरू
अकलूज : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर “माझे गाव, माझी जबाबदारी” या अभियानांतर्गत बुधवार (दि. २५ फेब्रुवारी २०२६) पासून विशेष उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे

.माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,नगराध्यक्षा सौ रेश्माताई अडगळे, अकलूज नगरपरिषद गटनेते तथा उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील व नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

प्रभाग क्रमांक ३ मधील गाळाधारक, दुकानदार व व्यापारी बांधवांच्या दुकानांसमोर अनियमित पार्किंगमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन नियमावलीचे पत्रक लावण्यात आले. तसेच संबंधित दुकानदारांना वाहने नियमानुसार व शिस्तबद्ध पद्धतीने पार्क करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या मोहिमेमुळे मुख्य रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून शहर वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रभाग क्रमांक 3चे नगरसेवक नम्रता राहुल (बंटी) जगताप,विशाल प्रकाश मोरे यांनी केले.







