*हंसराज नगर बागेची वाडी येथे शिवजयंती अतिशय पारंपरिक पद्धतीने साजरी*
माळशिरस प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड

सध्या.कर्णकर्कश्श आवाजात डीजे डॉल्बी लेझर शो च्या तालावर बेंधुंद होऊन विक्षिप्तपणे नाचणारा तरुणांनी आदर्श घ्यावा अशा पारंपारिक पद्धतीत माळशिरस तालुक्यातील बागेचीवाडी या गावातील हंसराजनगर परिसरातील युवकांनी अतिशय पारंपारिक पद्धतीत हलगी ढोलताश्याच्या कडकडाटात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमवून सोडून पूर्ण बागेचीवाडी गावात छत्रपती शिवाजी महाराज व शिवरायांचे मावळे यांच्या वेशभूषा करून संपूर्ण बागेचीवाडी गावातून शोभायात्रा काढण्यात आली
तर शोभायात्रेच्या मार्गावर गावातील महिला भगिनींनी सडा टाकून रांगोळी काढून औक्षणकरुनऩ ठिकठिकाणी स्वागत केले तत्पूर्वी सकाळी गावातील युवकांनी महिला वर्गांनी एकत्र येऊन छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महारांच्या मूर्तीची पूजा केली परिसरातील मुला-मुलींनी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले
सर्व कार्यक्रमानंतर परिसरातील सर्वच नागरिकांसाठी स्नेहभोजन आयोजित केले होते
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती किंवा कोणतेही सामाजिक कार्यक्रम करताना हंसराज नगर परिसरातील युवक महिलावर्ग जातपात धर्म न मानता स्वयंफुर्तीने सहभागी होत असतात म्हणूनच परिसरातील एकोपा कायमच टिकून राहतो या परिसरातील अनेक जयंती उत्सव मंडळांनी आदर्श घ्यावा अशी चर्चा रंगली होती
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हंसराज नगर परिसरातील सर्वच युवकांनी महिला भगिनींनी आपला सहभाग नोंदवला होता ……






