अकलूज–वेळापूर रस्त्यावरील जीवघेणे खड्डे व धुळीने त्रस्त नागरिक. क्रमशः -भाग -5
अकलूज (प्रतिनिधी )सोलापूर जिल्ह्यातील अत्यंत वर्दळीचा अकलूज–वेळापूर रस्ता सध्या नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
या मार्गावर पडलेले खोल व मोठे खड्डे तसेच वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे उडणारी धूळ यामुळे प्रवाशांचे आरोग्य आणि जीव दोन्ही धोक्यात आले आहेत.
रस्त्यावरील डांबर उखडल्यामुळे वाहने गेल्यानंतर धुळीचे लोट उसळत आहेत. त्याचा सर्वाधिक फटका लहान मुले आणि वृद्धाना बसत आहे.”श्वास घेणेही कठीण झाले आहे”. अशी आर्त हाक स्थानिक रहिवाशी देत आहेत.
दररोज या रस्त्यावरून शाळकरी मुले, कामगार, शेतकरी, रुग्णवाहिका आणि व्यापारी वाहने प्रवास करतात. मात्र खड्ड्यांमुळे वाहने डळमळीत चालत असून दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. किरकोळ अपघातांची संख्या वाढली आहे.
अनेकदा वाहनांचे नुकसान होत असून किरकोळ व गंभीर अपघातांचीही भीती नागरिक व्यक्त करत आहेत.रस्त्यावर उडणारी धूळ ही आणखी गंभीर समस्या बनली आहे. लहान मुले, वृद्ध नागरिक आणि श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सतत खोकला, डोळ्यांची जळजळ, दम लागणे आणि घशात खवखव अशा तक्रारी वाढत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.काही नागरिकांनी खासगी दवाखान्यात उपचार देखील सुरु केले आहेत.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी करूनही अद्याप केवळ पाहणी आणि आश्वासनांपुरतेच काम सुरू असल्याचा आरोप होत आहे. रस्ता दुरुस्ती, खड्डे बुजवणे आणि धूळ नियंत्रणासाठी पाणी मारणे यासारखी कामे नियमितपणे होत नसल्यामुळे संताप वाढत आहे
.अकलूज, वेळापूर, खंडाळी परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाला निवेदन दिली आहेत. तरीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
“या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे,” अशी प्रतिक्रिया एका स्थानिक वाहनचालकाने दिली.
नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने संपूर्ण रस्त्याचे मजबुतीकरण व कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही काही सामाजिक संघटनांनी, नागरिकांनी दिला आहे.
क्रमशः -भाग -5.
🚨अकलूज – वेळापूर रस्ता : संघर्ष सुरूच! 🚨
१५ फेब्रुवारीपासून संघर्ष योद्धा न्यूज पोर्टल या रस्त्यावरील गंभीर समस्या सातत्याने उघड करत आहे. 👥 नागरिक म्हणतात —“दररोजचा प्रवास म्हणजे जीवघेणा संघर्ष!” 🙏 अनेकांनी आम्हाला प्रतिसाद देत सांगितले —“कुणीतरी आमचा आवाज उठवतोय, याबद्दल धन्यवाद!” 🔥 आम्ही थांबणार नाही!हा रस्ता पूर्णपणे सुरक्षित व दुरुस्त होईपर्यंत आमची ही वृत्तमालिका सुरूच राहणार!
➡️ तुमचे अनुभव, तक्रारी व सूचना पाठवा
📲 7841847458🛣️ तुमचा आवाज — आमची लढाई!







सार्वजनिक बांधकाम खाते काय झोपा काढत आहे काय?
नेमके कोणाला हप्ते चालू आहेत याची चौकशी व्हायला हवी.. सर्वसामान्य नागरिकांना बांधकाम खात्याने पैसे खाऊन त्रास सोसावा लागत आहे