*नववर्षाचे औचित्य साधून अकलूज बस स्थानकावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले
अकलूज (प्रतिनिधी )नववर्षाचे औचित्य साधून अकलूज आगाराकडून सदाशिवराव माने विद्यालय येथील एन सी सी चे विद्यार्थी यांच्या मदतीने अकलूज नवीन बस स्थानक येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.



या अभियानात प्राध्यापक श्री. सतीश रनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 74 विद्यार्थ्यांनी स्वच्छता उपक्रम राबविला.

सदर स्वच्छता अभियान सुरू होते त्यावेळी बस स्थानकावर विद्यार्थ्यांसमवेत प्राध्यापक श्री. सतीश रनवरे सर , अकलूज आगाराचे आगार व्यवस्थापक श्री प्रमोद शिंदे, वरिष्ठ लिपीक श्री रविराज भांगे, श्री लक्ष्मण बानेवाड, वाहतूक नियंत्रक श्री. विजय रंदवे, श्री विजय लंगोटे,श्री शाहीर तांबोळी, श्री. विजय लोणकर हे उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांना बिस्कीट पुडा देऊन कार्यक्रमाची सांगता केली.






