अकलूज व नातेपुते येथे मका हमीभाव खरेदी केंद्र दि.२४/१२/२०२५ रोजी सुरू होणार
कृषि उत्पन्न बाजार समिती अकलूज व नातेपुते मका हमीभाव केंद्रास मंजुरी मिळाली असून मका खरेदीस बुधवार दि.२४/१२/२०२५ रोजी मार्केट कमिटीच्या गोडाऊनमध्ये खरेदीस सुरुवात होणार असल्याचे बाजार समितीचे सभापती मा.श्री.मदनसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.
मक्याचे दर पडल्याने शेतक-यांचे आर्थिक नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेवून अकलूज व नातेपुते येथे हमीभाव खरेदी केंद्र सुरु होत आहे. शेतक-यांकडून F.A.Q. दर्जाची मका खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी प्रति क्विंटल २४००/- रू. दर दिला जाणार आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतक-यांना एस.एम.एस. व फोन द्वारे सुचित केल्यानंतर मका खरेदी केंद्रावर मका घेवून यावी लागणार आहे.
मका खरेदी केंद्राचे उद्घाटन बाजार समितीचे सभापती मा.श्री.मदनसिंह मोहिते-पाटील यांचे शुभ हस्ते होणार असून सदर कार्यक्रमाकरीता तहसिलदार मा.श्री. शेजुळ साहेब, मा. श्री.नितीनराजे निंबाळकर, चेअरमन खरेदी विक्री संघ अकलूज व गोडाउन कीपर उपस्थित राहणार असलेचे बाजार समितीचे सचिव मा.श्री. राजेंद्र काकडे यांनी सांगितले.






