• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

अकलूज नगरपरिषद हद्दीत बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्याची राजरोसपणे विक्री

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
December 18, 2025
in आपले शहर
0
अकलूज नगरपरिषद हद्दीत बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्याची राजरोसपणे विक्री
0
SHARES
121
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज नगरपरिषद हद्दीत बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्याची राजरोसपणे विक्री

अकलूज (प्रतिनिधी )केंद्र सरकारने एकल वापर प्लास्टिकच्या वस्तूंवर विक्रीसाठी संपूर्ण बंदी घातली आहे. असे असताना देखील अकलूज नगरपरिषद हद्दीत किरकोळ व्यावसायिकांसह मोठ्या दुकानदारांनी बंदीतही संधी साधत बंदी असलेल्या प्लास्टिकची सर्रास विक्री सुरू ठेवली आहे. तसेच वापर देखील मोठया प्रमाणावर होत आहे.मात्र, याकडे अकलूज नगरपरिषद च्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

राज्य सरकारने एकल वापराच्या प्लास्टिकवर २०१८ मध्ये बंदी आणली होती. नगरपालिका, नगरपंचायतीच्यावतीने कारवाईचा धडाकाही लावण्यात आला होता. अकलूज नगरपरिषद स्थापन झालेंनंतर सुरवातीला मोठ्या प्रमाणावर प्रमाणावर कारवाई करून प्लास्टिक जप्त केले. फेरीवाले, हॉटेल, रेस्टॉरंट, प्लास्टिक व्यावसायिक आदींवरही कारवाई करत लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर मोहीम थंडावली कारवाई थांबल्याने स्थानिक व्यावसायिकांकडून वाढती मागणी पाहता शहरात पुरवठा करणारी साखळीही व्यावसायिकांकडून उभारल्या गेली.

काही व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी फेरीवाले देखील नेमले आहेत.तर काही व्यापाऱ्यांनी प्लास्टिक पिशवी चा साठा करण्यासाठी गोडाऊन केले आहे.प्लास्टिक विक्रेते यांच्यावर कारवाईसाठी शहरात पथकांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, अल्पावधीतच हे पथकही थंडावल्याने पुन्हा राजरोसपणे किरकोळ व्यावसायिकांपासून तर मोठ्या व्यावसायिकांपर्यंत बंदी असलेल्या काळ्या, गुलाबी, पांढऱ्या रंगाच्या कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्याची विक्री केली जात आहे.

काही व्यावसायिकांनी या बंदीतही संधी शोधून काढत प्लास्टिक विक्रीतून मोठा नफा कमविला जात आहे. 50मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशवी ला बंदी असताना देखील या पिशवी ची विक्री केली जात आहे.

पिशवी चा वापर झालेंनंतर या पिशव्या रस्त्यावर, गटारीत टाकून दिल्या जातात. त्यामुळे गटारी तुंबत आहेत. त्यामुळे पाणी पुढे न जाता रस्त्यावर येते. त्यामुळे अस्वच्छता होत आहे.

त्याचप्रमाणे शहरातील अनेक टपऱ्या मध्ये कमी जाडीच्या लहान पिशवीत भरून मावा विक्री केली जाते. मावा खाऊन झाल्यानंतर ती पिशवी रस्त्यावर टाकून दिली जाते.त्यामुळे शहराचे सौन्दर्य बिघडत चालले आहे. रस्त्यावर पडलेल्या प्लास्टिक पिशव्या उचलून नगरपरिषद ची कचरा गाडी त्या पिशव्या डम्पिंग ग्राउंड वर नेवून टाकते. त्याठिकाणी प्लास्टिक पिशव्याचा ढीग साचला आहे. काहीवेळेस हा कचरा पेटवून दिला जातो. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. तसेच परिसरातील नागरिकांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.याशिवाय मोकाट जनावरे देखील या ठिकाणचा कचरा सेवन करतात. त्यामुळे त्यांचेही आरोग्य धोक्यात आले आहे

. त्यामुळे यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे.प्लास्टिक बंदी २०२२ नियमानुसार उत्पादक, साठेदार, पुरवठादार, विक्रेते यांनी नियमभंग केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम २००६ च्या कलम ९ अन्वये कारवाई होते. त्यात पहिल्या गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी १० हजार त्यानंतर तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास, २५ हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्याची तरतूद आहे

.सजावटी प्लास्टिक व थर्माकोल, मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड व सिगारेट पाकिटे यांची प्लास्टिक आवरणे, प्लास्टिक कांड्यांसह, कानकोरणी, फुग्यांसाठी प्लास्टिकच्या कांड्या, प्लास्टिकचे झेंडे, कँडी कांड्या, आईस्क्रीम कांड्या, प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे, चमचे चाकू, पिण्याचे स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या, १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे पीव्हीसी बॅनर आदी.

या बरोबर कंपोस्टेबल प्लास्टिक, सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, डिश बाऊल, डबे यावर बंदी आहे. शहरात कारवाईसाठी प्रशासनाच्यावतीने पथक तयार करण्यात आले होते. यांच्याकडून सुरुवातीला किरकोळ व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. मात्र, मोठे मासे काही गळाला लागले नाही.

त्यामुळे स्थानिक प्रशासनाची याकडे डोळेझाक तर होत नाही ना, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
माढा मतदारसंघातील अपघातप्रवण मार्गांवर सुरक्षा उपायांची मागणीखासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट

माढा मतदारसंघातील अपघातप्रवण मार्गांवर सुरक्षा उपायांची मागणीखासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In