अकलूज कृषि उत्पन्न बाजार समिती चे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते अलोरा कॅफे चे उदघाटन
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज कृषि उत्पन्न बाजार समिती चे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते वाघोली येथील संकेत मिसाळ यांनीअकलूज येथे सुरु केलेल्या अलोरा कॅफे चे उदघाटन संपन्न झाले.
यावेळी राजेंद्र मुळे यांनी प्रास्ताविक केले.
या नवीन व्यवसाय ला शुभेच्छा देऊन मदनसिंह मोहिते पाटील यांनी बोलताना सांगितले की,आजकालच्या तरुणांच्या आवडी -निवडी लक्षात घेऊन व्यवसाय सुरु करायला हवेत.या अनुषंगाने संकेत मिसाळ यांनी चांगला व्यवसाय सुरु केला आहे.
यावेळी बोलताना फर्म चे प्रॉप्रायटर संकेत मिसाळ यांनी सांगितले की, तरुणांच्या आवडी लक्षात घेऊन कोल्ड कॉफी, पिझ्झा, बर्गर, सॅन्डविच,याशिवाय इतरही अनेक पदार्थ उपलब्ध करून दिले आहेत. याचा स्वाद तरुणांना निश्चितपणे आवडेल. असे त्यांनी आवर्जून सांगितले.
याप्रसंगी पंचायत समिती चे मा. उपसभापती सूर्यकांत अप्पा शेंडगे,साखर कारखान्याचे संचालक सतीश शेंडगे,राजू भोसले,पै. दत्ताभाऊ मगर,सतीश शेंडगे,सचिन मिसाळ, सुदर्शन मिसाळ,पंडित मिसाळ,अमोल मिसाळ, चंद्रसेन मिसाळ, राजेंद्र मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी उपस्थितांचे स्वागत दिगंबर मिसाळ,रामदास मिसाळ,सौ. रसिका मिसाळ,सौ. सुषमा घोरपडे यांनी केले.






