कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज येथे मका उत्पादकांसाठी निर्णय हमीभाव खरेदी नोंदणीला सुरुवात
अकलूज (प्रतिनिधी)माळशिरस तालुक्यातील सर्व शेतक-यांच्या सोयीसाठी.आ. रणजितसिंह मोहिते-पाटील व बाजार समितीचे सभापती श्री.मदनसिंह मोहिते-पाटील यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे खरिप-हंगाम २०२५-२६ मधील आधारभूत किंमत मका खरेदी योजनेच्या कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज व दुय्यम बाजार पेठ, नातेपुते येथे ऑनलाईन नाव नोंदणी चालू झाली असून शेतक-यांनी त्याचा लाभ घ्यावा.
शासनाच्या निर्देशान्वये शेतक-यांना नाव नोंदणी करून मका आणावी लागणार आहे. नाव नोंदणीसाठी मका पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा, बॅक पासबुक, आधार कार्ड यांच्या झेरॉक्स ही कागदपत्रे आवश्यक आहेत. यावर्षी मक्याची आधारभूत किंमत २४००/- रूपये निश्चित करणेत आलेली आहे.
शेतक-यांनी मका शेतीमाल वाळवून, स्वच्छ करून आणावा व हमीभाव केंद्राचा लाभ घ्यावा. असे आवाहन बाजार समितीचे सभापती मा. श्री. मदनसिंह मोहिते-पाटील व सचिव राजेंद्र काकडे यांनी केले आहे.






