माळशिरस तालुक्याच्या शेतकर्यासाठीआनंदाचा क्षण प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आर्थिक वर्ष 2023 24 मधील कामगिरीच्या आधारे राज्य शासनाने जाहीर केलेल्या वार्षिक क्रमवारीत मदनसिंह मोहिते पाटील सभापती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज ने राज्यात आठवा क्रमांक पटकावून राज्यातील टॉपच्या दहा बाजार समितीमध्ये आपले स्थान मिळवले आहे ही माहिती पणन संचालक विकास रसाळ यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून देण्यात आले आहे

राज्यातील एकूण 305 बाजार समित्या पैकी हिंगणघाट (जिल्हा वर्धा) बाजार समितीने प्रथम क्रमांक मिळवला असून कारंजा लाड दुसऱ्या आणि बारामती बाजार समिती तिसऱ्या क्रमांकावर आहे विशेष म्हणजे आर्थिक उलाढालित आघाडी व असलेल्या मुंबई व पुणे बाजार समिती यांना यावर्षी टॉप टेन मध्ये स्थान मिळालेले नाही ही क्रमवारी शेतमाल विक्री व्यवस्थेतील पायाभूत सुविधा आर्थिक व कायदेशीर कारभार विविध योजना व उपक्रमात सहभाग आधी 35 निकषावर आधारित असून त्यासाठी 200 गुणांची मर्यादा निश्चित करण्यात आली होती खाजगी बाजारांसाठी 40 निकषांसह 250 गुणांचे मूल्यमापन करण्यात आले राज्यातील टॉप च्या दहा बाजार समित्या व गुण हिंगणघाट (वर्धा) 178. कारंजा लाड 171.5. बारामती 165 .लासलगाव (नाशिक) 157.5 .पंढरपूर (सोलापूर)155.5. चांदूरबाजार (अमरावती ) 155.5 अकोला (अकोला) 154.5. अकलूज (सोलापूर) 149, उमरेड (नागपूर )152.5, मंगरूळपीर (वाशिम )149, याबरोबरच लातूर 148.5 व संगमनेर 148या बाजार समिती यांनी ही उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे बाजार समिती यांच्या या क्रमवारीमुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल कोणत्या बाजारात विक्रिसाठई न्यायचा याचा स्पष्ट अंदाज येणार आहे हा उपक्रम बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत राबवण्यात येत असून जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्यात दोन वर्षापासून बाजार समितीची वार्षिक क्रमवारी जाहीर केली जाते






